Crop Compensation : राज्यामध्ये जानेवारी महिना ते मे 2024 या काळात अवेळी पावसाने झोडपले, त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून 2 ऑगस्ट रोजी निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला निधी 103 कोटी 34 लाख 73 हजार एवढा असून 73 हजार शेतकर्यांना हे अनुदान मिळणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत रक्कम डीबीटीद्वारे बँक अकाऊंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. ही नुकसान भरपाई नेमकी कोणत्या शेतकर्यांना मिळणार? चला तर मग ही माहिती जाणून घेऊया..(Nuksan Bharpai 2024)..
या 73 हजार शेतकर्यांना मिळणार नुकसान भरपाई
बुलढाणा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पाऊस झाल्याने नुकसानग्रस्त झालेल्या 73 हजार शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 103 कोटी 34 लाख 73 हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही नुकसान भरपाई 3 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्या काळात गहू, मका, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
महसूल विभागाकडून याचे संयुक्त पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला आणि विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नेमके अनुदान कधी मंजूर होणार? याकडे जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर 3 ते 4 महिन्याच्या काळानंतर निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणाला किती मिळणार नुकसान भरपाई?
जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 600 एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर बागायत पिकांसाठी हेक्टरी 27 हजार एवढी भरपाई मिळणार आहे. तसेच बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये एवढी मदत देण्यात येणार आहे.