‘मागेल त्याला घर’ या योजनेतून मुंबईत घ्या स्वस्त घर; पहा म्हाडाच्या ‘या’ योजनेबद्दल माहिती..!

Mhada Flats Mumbai : मुंबईकरांनो म्हाडा आणि सिडकोच्या परवडणाऱ्या घरांचे अपडेट आपण आपल्या वेबसाईटवर नेहमीच पाहत असतो. अलीकडेच म्हाडाने आपली परवडणारी घरे विकण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. ‘मागेल त्याला घर’ या योजनेंतर्गत घरे विकण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. तसेच आता कागदपत्रांच्या जाळ्यात अडकण्यापासून ग्राहकांची सुटका झाली आहे. म्हाडाने कागदपत्रांच्या नियमांत मोठा बदल करून फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन ओळखपत्रांवर घर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता म्हाडाची घरे (Mhada Flats) मिळवणे ग्राहकाला सोपे झाले आहे.

मागेल त्याला घर योजनेअंतर्गत येथे मिळणार घर

मुंबईत आपल्याला म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) लागावे असं स्वप्न अनेकजण पाहतात. पण प्रत्येकालाच म्हाडाचे घर लॉटरीत लागत नाही. पण आता म्हाडाने ‘मागेल त्याला घर’ योजना आणल्याने आता कोणीही घर घेऊ शकतो. विरार बोळींज येथील घरांसाठी ही योजना आणण्यात आली आहे. विरार बोळींज येथे म्हाडाचा 10 हजार घरांचा प्रकल्प आहे. यापैकी 5 हजार घरे आतापर्यंत विकली आहे. पण यातील 5 हजार घरांची अजूनपर्यंत विक्री झालेली नाही. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने ‘प्रथम येणार्‍यास प्राधान्य’ आणि अजून काही योजना आणून देखील या घरांची विक्री झाली नाही. या प्रकल्पात पाण्याची समस्या असल्याने या घरांना ग्राहक मिळत नव्हते. पण आता या प्रकल्पातील पाण्याची समस्या दूर झाली असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकल्पाला आता सूर्या धरणातून पाणी मिळत आहे.

संधी सोडू नका; मुंबईत घरांची मोठी लॉटरी, ही कागदपत्रे तयार ठेवा, येथे क्लिक करून पहा बातमी..

या प्रकल्पातील घरांची किंमत

विरारमधील बोलिंज या गृह प्रकल्पात 1 BHK आणि 2 BHK घरे आहेत. या प्रकल्पातील 1 BHK घरांची किंमत 23 लाख 28 हजार 566 रुपये असून चटई क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया 330 स्क्वेअर फूट आहे. आणि 2 BHK घरांची किंमत 41 लाख 81 हजार 834 असून त्याचे चटई क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया 675 स्क्वेअर फूट एवढा आहे.

म्हाडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अर्जदाराला पॅनकार्ड आणि आधार कार्ड ही दोन कागदपत्रे दाखवून अर्ज सादर करता येणार आहे. विशेष म्हणजे अर्जदाराने पैसे जमा केल्यानंतर फक्त दोन आठवड्याच्या आत घराच्या चाव्या अर्जदाराला देण्यात येणार आहे. ही घरे घेण्यासाठी अर्जदार म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

Leave a Comment