पुण्यात कमी पैशात घ्या भाड्याने घर, येथे पहा पुण्यातील स्वस्त भागांची यादी..!

Pune Affordable Flats : मित्रांनो, जसे की आपण सगळे जाणतोच, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक IT हब म्हणून वेगाने उदयास येणारे शहर आहे. मुंबईनंतर पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मानले जाते. येथील मोठ्या उद्योगांचा विकास आणि आयटी क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास यामुळे पुणे आता तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

साहजिकच आहे की आता अनेक तरुण-तरुणी करिअर आणि शैक्षणिक कारणांसाठी पहिली पसंती पुण्याला देत आहेत. त्यामुळे साहजिकच हे तरुण तरुणी जेव्हा पुण्यात येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी अपार्टमेंटची गरज असतेच. अनेक तरुण-तरुणी पुण्यात शिक्षण व जॉब सोबतच, परवडणाऱ्या किमतीत कुठे फ्लॅट (2 BHK Flats Pune) मिळेल का याचा शोध घेत असतात. मिळवू पाहत आहेत. जर तुम्ही पुण्यात राहण्यासाठी सर्वात स्वस्त जागा शोधत असाल, तर आजच्या या लेखात, आम्ही तुम्हाला पुण्यातील काही सर्वोत्तम जगांबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही भाड्याने अगदी स्वस्त दरात फ्लॅट घेऊ शकता.

पुण्यात या ठिकाणी मिळेल भाड्याने स्वस्त दरात फ्लॅट:

1.कात्रज: कात्रज हे कोल्हापूर ते बँगलोर ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ स्थित असून तरुण आणि व्यावसायिकांसाठी पुण्यातील अत्यंत लोकप्रिय असे ठिकाण आहे. शिवाय कात्रज स्वारगेट बस आगराजवळ असून या ठिकाणाहून संपूर्ण पुण्यासाठी बस उपलब्ध आहेत.

पुण्यात कुठेही फिरायचे असल्यास हे ठिकाण अधिक सोयीचे आहे. आधीचा कात्रज तलाव परिसर आता पूर्णपणे निवासी संकुलांसह विकसित झाला असल्याने याठिकाणी तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत भाड्याने फ्लॅट मिळू शकतात. साधारणपणे येथे 1BHK फ्लॅटचे भाडे 7,200 ते 8,040 रुपयांपर्यंत आहे.

येथे वाचा – फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

  1. वारजे: पुणे शहरापासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आपले वारजे स्थित आहे. गेल्या दहा वर्षांत या जागेचा खूप विकास झाला असल्याचं दिसून येत आहे.

हे ठिकाण कोथरूडचा आध्यात्मिक विस्तार म्हणूनही ओळखले जाते. एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी वारजेच्या अगदी जवळच आहे. येथे 1BHK फ्लॅटचे भाडे साधारण 7,800 ते 8,500 रु. प्रति महिना असेल.

  1. धायरी: हे ठिकाण सिंहगड रोड आणि राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ असून येथील सिम्पणी आयटी पार्क आणि खडकवासला धरण हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तुम्हाला धायरी मधे स्वस्त फ्लॅट्स मिळू शकतात.

साधारणपणे, धायरी मधे 1BHK फ्लॅटचे भाडे 6,200 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान असते. या ठिकाणी सिंहगड कॉलेज तसेच एशियन कॉलेज ऑफ कॉमर्स सारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था सुद्धा स्थित आहेत. एवढेच नाही तर या ठिकाणी पू. ल. देशपांडे पार्क, अभिरुची मॉल आणि मल्टीप्लेक्स देखील आहे.

  1. विश्रांतवाडी: या भागाचे क्षेत्रफळ खूप मोठे असल्याने, हा भाग पुणे शहराचा सर्वाधिक लोकसंख्येचा भाग म्हणून ओळखला जातो. हा परिसर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. या ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून तुलनेने शांत असे हे क्षेत्र आहे. विश्रांतवाडीत तुम्हाला तुलनेने स्वस्त फ्लॅट्स मिळू शकतात कारण या ठिकाणच्या आसपास असणाऱ्या विमान नगर आणि मांजरी सारख्या ठिकाणी फ्लॅट्स च्या किमती जास्त आहेत.

साधारणपणे, विश्रांतवाडीतील 1BHK फ्लॅट चे भाडे 7500 ते 8200 रुपये आहे. या ठिकाणी एसएनबीपी कॉलेज, आंबेडकर कॉलेज सारख्या शैक्षणिक संस्था सोबतच श्री महालक्ष्मी मिनी मॉल आणि क्रिएटिव्ह सिटी मॉल सुद्धा आहे.

आता लॉटरी शिवाय घ्या म्हाडाचा 2 BHK फ्लॅट; मिळतील भरमसाठ सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

5.भोसरी: जर तुम्ही राहण्यासाठी शांत आणि खिशाला परवडणारी जागा शोधत असाल तर भोसरी हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण साबित होईल. पुण्यातील सर्वात प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र म्हणून भोसरी शहराला ओळखलं जातं कारण या शहराच्या मध्यभागी MIDC, टाटा मोटर्ससारखे उद्योग स्थित आहेत. सोबतच अनेक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने, भोसरी हे हळूहळू अनेकांचे आवडते ठिकाण बनत आहे. भोसरी मधे तुम्हाला 1BHK फ्लॅट साधारणतः 8,700 ते 9,700 रुपये प्रति महिन्याच्या रेंज मधे मिळू शकतो.

या शिवाय तुम्ही पुण्यात हिंजवडी, धनकवडी, वाघोली यांसारख्या ठिकाणांचा सुद्धा विचार करू शकता.

Leave a Comment