मुंबईकरांनो! स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर..!

2 BHK Flat Mumbai : मुंबईत तुम्हालाही घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे. मुंबईत घर (2 BHK flat Mumbai) स्वस्तात खरेदी करण्यासाठी अनेक जण धावपळ करताना दिसून येतात. इथे दररोजच घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. मुंबईत घराचे ठिकाण आणि घराच्या क्षेत्रफळानुसार किमती बदलतात. जर चांगल्या लोकेशनवर कमी किमतीत घर घ्यायचे असेल तर त्यासाठी एक महत्वाची ट्रिक माहिती असणे आवश्यक आहे. घर घेत असताना ते कमी किमतीत मिळावे यासाठी काय केले पाहिजे? अशी महत्वाची माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत.

मुंबईत जॉब किंवा उद्योग-व्यवसाय करणार्‍या व्यक्तीचे मुंबईत हक्काचे घर (2 BHK flat Mumbai) घेण्याचे स्वप्न असते. कारण मुंबईत भाड्याच्या घरात राहणे देखील सोपे नसते. भरमसाठ भाडे द्यावे लागत असल्याने पगारातील मोठा हिस्सा केवळ घर भाड्यात जातो. त्यामुळे एकदाचे घर खरेदी केले की घर भाड्याच्या भानगडीतून मुक्त होऊ असा विचार अनेक जण करतात. पण मुंबईत घरांच्या किंमती जास्त असल्याने अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. असे असले तरी तुम्ही घर खरेदी करताना एक नियम लक्षात ठेवला तर तुम्हाला घर 20 ते 30 टक्के स्वस्त मिळेल.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

घर घेताना ही ट्रिक लक्षात ठेवा

मुंबईत घर घेत असताना घर केव्हा स्वस्त मिळेल याचा विचार नक्कीच केला पाहिजे. जर तुम्ही रेडी पझेशन असलेला फ्लॅट घेत असाल तर तो फ्लॅट तुम्हाला नक्कीच महाग मिळणार. कारण त्या घराचा ताबा तुम्हाला लगेच मिळत असतो. पण एक वेळ अशी असते जेव्हा बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असते म्हणजेच बिल्डिंगचे बांधकाम चालू असते, अंडर कन्स्ट्रक्शन दरम्यान जर फ्लॅट बूक केला तर नक्कीच फ्लॅट तुम्हाला 20 ते 30 टक्के एवढा स्वस्त मिळू शकतो. काही काळानंतर ती घरे राहायला जाण्यास तयार झाल्यानंतर त्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळतात.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

Leave a Comment