याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

Real Estate : सध्या भारत देशातील रियल इस्टेटचे क्षेत्र अधिक विकसित होत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अगदी मोठ्या प्रमाणावर रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जात आहे. रियल इस्टेट मधील गुंतवणुकीच्या एकंदरीत स्वरूपाकडे आपण नजर टाकली तर भविष्यकाळातील विकास या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याची दिसत आहे (Real estate investment). ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या ठिकाणी पुढील दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये नक्की कसा विकास होऊ शकतो? तसेच पायाभूत सुविधा त्या ठिकाणी कशाप्रकारे निर्माण होऊ शकतात? या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करूनच रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते.

पुणे शहराचा आपण जर विचार केला तर हे एक वेगाने विकसित झालेले शहर आहे. अजून देखील पुणे शहर तसेच परिसर झपाट्याने विकसित होत असल्याचे दिसत आहे. अशावेळी पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीला नागरिक चांगली पसंती देत आहेत. या दृष्टिकोनातून आपण अगदी व्यवस्थितपणे पाहिले तर, पुण्यामधील लोहगाव विमानतळावरील भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच पुरंदर तालुक्यामध्ये एक नवीन विमानतळ होत आहे. हे विमानतळ म्हणजे ”छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ”.

येथे वाचा – खुशखबर! 594 घरकुलांना मान्यता; मोदी आवासला झाली सुरुवात, पहा कामाची बातमी..!

पुरंदर तालुक्यामध्ये हे विमानतळ होणार असून याची ओळख पुरंदर विमानतळ म्हणूनही होणार आहे. अद्याप विमानतळाचे बांधकाम सुरू झाले नाही, परंतु आगामी कालावधीत प्रवासी वाहतूक तसेच बाल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या विमानतळाचे महत्त्व हे अनन्यसाधारणच असेल. सर्वसाधारणपणे बघितले तर 40 ते 45 किलोमीटर पुणे शहरापासून दूर असलेले हे विमानतळ थोडे लांब आहे.

परंतु पुढील काही कालावधीतच या विमानतळाचा विकास होईल, त्यावेळी पुणे शहराचा सुद्धा तितकाच विस्तार होणार आहे. तसेच यामध्ये हे अंतर कमी होण्यास मोठी मदत होईल. या ठिकाणी असलेला राष्ट्रीय महामार्ग 48 तसेच 65 व इतर महत्त्वाचे चार मार्ग आहेत. त्यांच्या मध्यातून शहराच्या इतर भागांशी पुरंदर विमानतळाची जोडणी केली जाईल. या विमानतळाची कनेक्टिव्हिटी बघितली तर पुणे शहरांमधील महत्त्वाच्या औद्योगिक ठिकाणांशी वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच रिंग रोड सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

त्यामुळे आता आगामी कालावधीत या विमानतळाच्या आसपास निवासी किंवा कमर्शियल जागांची मागणी झपाट्याने वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांनी भविष्यातील फायदा लक्षात घेऊनच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे. या दृष्टिकोनातूनच पुरंदर विमानतळा जवळ भविष्यकालीन आर्थिक दृष्टीकोनातून नक्की कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे अगदी फायद्याचे ठरेल याविषयी माहिती जाणून घेऊया.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

पुरंदर विमानतळा जवळील गुंतवणूक करण्यासाठी विविध महत्त्वाचे ठिकाण पाहूया:

1) सासवड –

सासवडचा जर आपण विचार केला तर पुणे रेल्वे स्टेशन तसेच पुरंदर विमानतळ या दोन्ही ठिकाणांशी एक फायदेशीर असे संलग्न असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी सध्या चांगल्या वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच नेक शॉपिंग मॉल व मनोरंजनाचे विविध पर्याय देखील त्या विभागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या सध्याच्या प्रॉपर्टीच्या किमती बघितल्या तर एका प्लॉट साठी तीन लाख रुपये पासून ते दोन बेडरूम फ्लॅटसाठी अगदी दीड कोटी रुपयांपर्यंत च्या किमती पाहायला मिळतील.

2) धानोरी –

धानोरी हे प्रामुख्याने पुरंदर विमानतळा सोबतच लोहगाव विमानतळ तसेच पुणे रेल्वे स्टेशन सोबत एक सुंदर कनेक्टिव्हिटी असलेले ठिकाण आहे. धानोरी मध्ये निवासी प्रकल्पांसोबतच विविध नामांकित शाळा, महाविद्यालय, तसेच नर्सिंग होम, मार्केट, हॉस्पिटल व मॉल देखील त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे पाहिले तर मालमत्तेच्या किमती 5,870 चौरस फुटापासून सुरू होतात ते 6,962 रुपये प्रति चौरस फुटापर्यंत आहेत. सध्या या ठिकाणी बघितले तर पॅलेडियम ग्रँड यासोबतच गिनी बेलीना असे विविध प्रकल्प उपलब्ध आहेत.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

3) बिबवेवाडी –

हे पुण्यामधील दक्षिणेकडील महत्त्वाचे ठिकाण आहे. बिबवेवाडी या ठिकाणी सामाजिक तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी विविध विकसित बाजारपेठा आपल्याला पाहायला मिळतील. औद्योगिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर या ठिकाणी हडपसर औद्योगिक वसाहत, सायबर सिटी मगरपट्टा, तसेच सर्व आयटी पार्क चा समावेश होतो. या ठिकाणी असलेल्या सध्याच्या घराच्या किमती बघितल्या तर कमीत कमी 7,084 रुपये प्रती चौरस फुटापासून सुरू होतात ते 11,502 रुपये प्रति चौरस फुटापर्यंत आहेत. तिथे आपल्याला कोहिनूर जीवा तसेच संस्कृती पंचतत्व यासारखे विविध प्रकल्प पाहायला मिळतील.

4) भोसले नगर –

आगामी येऊ घातलेल्या पुरंदर विमानतळापासूनच फक्त 11 किलोमीटर अंतरावर भोसले नगर आहे. या परिसराशी पुणे शहरांमध्ये इतर महत्त्वाच्या ठिकाणांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. भोसले नगर परिसरामध्ये कॉमर्स झोन तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क सारखेच विविध रोजगार केंद्र व रुग्णालय शाळा त्या ठिकाणी चांगल्या विकसित झालेल्या आहेत. सर्वसाधारणपणे 2021 पासूनच त्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेच्या किमतीचा विचार केला तर 13,337 प्रति चौरस फुटापासून यंदाच्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये 14801 प्रति चौरस फुटापर्यंत वाढलेल्या दिसतील.

अशा पद्धतीने भविष्यातील फायद्याच्या दृष्टिकोनातून सध्याच्या गुंतवणुकीसाठी पुरंदर विमानतळा जवळील एकाही प्रमुख ठिकाणे नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतात.

Leave a Comment