मुंबई नाही तर याठिकाणी लोक घेताय स्वप्नातील घर, तुम्ही सुद्धा करा खरेदी..!

2 bhk flat in Pune : देशभरातील घरांच्या विक्रीचा विचार केला तर मागील तीन महिन्यांमध्ये सर्वात जास्त घरांची विक्री पुणे शहरामध्ये झाली आहे. मुंबई पेक्षाही अधिक पुण्यामध्ये घर (2 bhk flat in Pune) खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त दिसून आली आहे. अशावेळी कित्येकांना असा प्रश्न पडला आहे की, नक्की कोणत्या कारणामुळे पुणे शहरात घर खरेदी करण्यास सर्वसामान्य नागरिक प्राधान्य देत आहेत.

पुणे शहर शिक्षण तसेच औद्योगिकदृष्ट्या अगदी प्रगत झालेले शहर आहे (buying house). सांस्कृतिक राजधानी या नावाने पुण्याला ओळखले जाते. पुणे शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. रोजगाराच्या विविध संधी त्या ठिकाणी मिळत आहेत. माहिती तसेच तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याची संपूर्ण देशभरात ख्याती आहे. यामुळे आता पुणे शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता सी आर इ मॅट्रिक्स अंतर्गत सहामाही अहवाल आलेला आहे. त्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की, सर्वात जास्त घरांची खरेदी फक्त पुणे शहरामध्ये झाली आहे. (ready to move flats)

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करण्याची संधी! येथे क्लिक करून पहा बातमी..

पुणे शहरात किती घरांची झाली विक्री;

पुणे शहरामध्ये घरांची विक्री दिवसेंदिवस वाढ झाली आहे. अशी माहिती सी आर इ मॅट्रिकच्या माध्यमातून दिली जात आहे. देशभरातील शहरांमधील जी काही घरं विक्रीची माहिती असेल ती त्यामधून आपल्याला मिळते. त्यानुसार आता सर्वात जास्त विक्रीही पुणे शहरामध्ये होत आहे. जानेवारी महिन्यापासून जून महिन्यापर्यंत च्या कालावधीत पुणे शहरात तब्बल 45 हजार घरांची विक्री झाली आहे. त्यानंतर क्रमांक येतो हैदराबाद, बेंगळुरूचा या शहरांमध्ये सुद्धा 38 हजार तसेच 40 हजार अनुक्रमे घरांची विक्री झालेली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई या ठिकाणी घर घेणे खूपच महाग आहे. तरीही तब्बल 22 हजार घरे त्या ठिकाणी मागील सहा महिन्यात विकली गेली आहेत. त्यानंतर याच्यामागे दिल्लीचा क्रमांक येतो त्या शहरांमध्ये सुद्धा 21 हजार घरांची विक्री झाली आहे.

खुशखबर ! मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; याठिकाणी तब्बल 16 हजार परवडणारी घरे..आता स्वस्तात मिळणार घर, कसा घ्याल लाभ?

पुणे शहराला का आहे पसंती;

पुणे शहर मुंबई पासून तीन तासाच्या अंतरावर आहे. पुणे शहरामध्ये बघितले तर दळणवळणाच्या अगदी चांगल्या सुविधा आहेत. पुणे शहरांमध्ये शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या सोबतच रोजगार सुद्धा त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतो. पुणे शहरामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपन्या कार्यरत आहेत. या क्षेत्रामधील तरुण वर्ग पुणे शहरांमध्ये घर घेण्यास प्राधान्य देत आहेत. निवृत्तीनंतर पुणे शहरांमध्ये राहण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. कारण की सवयीमुळे तेथील वातावरण चांगले मानवलेले असते. या कारणामुळे पुणे शहरात घरांची विक्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

काय सांगता ! ही एक आयडिया घर खरेदी करताना वाचवेल लाखो रुपये..पहा आणि स्वतःचा फायदा करा..!

काय म्हणतात तज्ज्ञ;

शाद ग्रुप ऑफ कंपनी या कंपनीचे सीईओ उस्मान इस्लाम कुरैशी यांनी अशी माहिती दिली आहे की, मुंबईमध्ये जागांची कमतरता भासत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यास अडथळे येत आहेत. त्या ठिकाणी प्रदूषण तसेच वाढत जाणारी वाहतूक हा मोठा प्रश्न आहे. परंतु पुणे शहरांमध्ये विविध चांगल्या सुविधा आपल्याला मिळत आहेत. या शहरात अगदी स्वस्तात घरे सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे मुंबईपेक्षा पुण्यामध्ये लोक घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत..

Leave a Comment