ब्लॉग द्वारे पैसे कमवता येतात का?

ब्लॉगिंग हा शब्द अजुन सुद्धा बऱ्याच जणांसाठी एक नविन शब्द आहे पण अलिकडच्या काळात खुप वेगाने बदलत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे युवक गुगल व यूट्यूबच्या मदतीने पैसे कमावण्याचे स्वप्न बघत असतात. ब्लॉग द्वारे पैसे कमवता येतात का? Can make money from blog in Marathi? या सर्च keyword चा जास्त वापर होताना दिसत आहे.

लोक ऑनलाइन खरेदी-विक्री व डिजिटल न्यूज़ पेपर वाचण्याला पसंती देत असल्यामुळे ब्लॉगिंग करणाऱ्यांसाठी हा नक्कीच पैसे कमावण्यासाठी चांगला मार्ग आहे असे नाकारता येत नाही. डिजिटल क्रांती मुले ब्लॉगिंग दिवसेंदिवस एक उत्तम करिअर चा एक पार्ट बनत आहे, भारत सरकारची डिजिटल भारत योजना यशस्वी झाली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

सोप्या भाषेत ब्लॉगिंग शिकण्यासाठी इथे क्लिक करा

ब्लॉग द्वारे पैसे कमवता येतात का? हे बघण्या अगोदर आपन ब्लॉगिंग म्हणजे काय? हे थोड्कयात बघूया..

ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging mhanje kay?)

आपल्याला हवी असलेली माहिती आपण गूगल वर शोधत असतो. सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर लगेच result येऊन आपल्याला माहिती मिळते. ती माहिती आपल्याला कोण देत असतो? हा प्रश्न आपल्या पैकी बऱ्याच जणांना पडला असेल. काही जणांना Google माहिती पुरवते किंवा गूगल त्याच्या कडे असलेली स्वतः ची माहिती देत असतो असा गैर समज झालेला असतो.

आपल्या जवळ असलेल्या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपल्या user ला हवी असलेली माहिती गूगल सर्च keyword च्या मदतीने आपल्या user समोर आनून देत असते. ही माहिती गूगलला ब्लॉगर द्वारे प्राप्त होते. ब्लॉगर आपल्या आवडीच्या विषयावर लिखान करत असतात. लिखानाच्या याच व्यवसायाला ब्लॉगिंग असे म्हणतात.

ब्लॉग द्वारे पैसे कमवता येतात का? Can make money from blog in Marathi?

नक्कीच, आपल्याकडे जर वाचनाची व उत्तम प्रकारे लिखान करण्याची कला असेल किंवा आपल्या व्यवसाया बद्दल लिखाण (व्यवसाय डिजिटल मार्केटिंग) करण्यात जर रस असेल तर आपण ब्लॉगिंग हा व्यवसाय पण करु शकता. आपल्या वेबसाइट वरील वाचक(Reader) वाढल्यानंतर गूगल आपल्याला Adsense देत असते त्याद्वारे आपाल्याला वेग-वेगळ्या कंपन्यांचे Ads म्हणजेच जाहिराती मिळतात.

या प्रकारे आपण पैसे कमावू शकतो. आपल्या स्वतःच्या छोट्या-मोठ्या उद्योगांच्या जाहिराती किंवा डिजिटल उत्पादन(कोर्से किंवा pdf book) ऑनलाइन विकण्यासाठी ब्लॉगिंग हा एक सर्वात चांगला व स्वस्त पर्याय आहे.

आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट च्या माध्यमातून अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम आपण चालवून पैसे कमावू शकतो. मोठ-मोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स च्या जाहीराती आपल्या वेबसाइट वर देऊन वाचकांकडून त्या खरेदी झाल्या तर आपल्याला काही प्रमाणात म्हजेच 10 किंवा 12 टक्के कमिशन मिळते.

या साठी आपल्याला आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट वर येणाऱ्या वाचकांची(readers) किंवा visitors ची गरज भासते. त्यासाठी आपल्याला आपल्या वेबसाइट चे SEO (Search engine optimization) आणि Facebook वर जाहिरात मार्केटिंग(डिजिटल मार्केटिंग) करणं गरजेचं असतं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी आपल्याला स्वतः लिहिण्याची आवड असायला पाहिजे, दुसऱ्याची copy paste केलेली माहिती monetize होत नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी….

आमच्या फेसबुक पेजला लाईक करा

Leave a Comment