CBI ची छापेमारी, अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल, राज्यात राजकीय घडामोडींना वेग..!

मुंबई :  परमबीर सिह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण विरोधकांनी उचलुन धरले होते. आरोप-प्रत्यारोपानंतर राज्य सरकारने अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री पदाचा राजिनामा घेतला होता. समोर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 6 एप्रिल पासून सीबीआयने चौकशी सुरू केली.
महीन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट प्रकरणी सीबीआय ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर व मालकीच्या अशा दहा ठिकाणी शनिवारी सकाळी 7 वाजता छापेमारी केली. सीबीआयने चौकशी केल्यानंतर अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.

छापेमारीनंतर राज्यातील घडामोडींना वेग
शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआय ने छापेमारी केली. यामुळे आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधक चांगलेच आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. याविषयी बोलतांना संजय राऊत म्हणाले की “या गोष्टी देशभरात काही काळ थांबवायला हव्यात. किमान एक किंवा दोन महिने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी आपापलं राजकारण थांबवावं. कारण प्रत्येकाला आता कोविडशी लढण्याची गरज आहे”, असं संजय राऊत बोलले.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सीबीआय कारवाई संदर्भात आपली भुमिका मांडली. ‘सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”, असं संजय राऊत यांनी बोलतांना स्पष्ट केलं. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment