शेतकऱ्यांनो, तो पुन्हा आला, विजेचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता..!

राज्यातील पाऊसाचे संकट संपता संपत नाहिये. एक संकट संपल्या नंतर लगेच दुसरे संकट बळीराज्यासमोर उभे आहे. अलीकडेच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात सध्या रब्बीची पिके (हरभरा, उन्हाळी सोयाबीन) सध्या काढणी करण्याच्या स्थितीत आहे, यामूळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.(Aajcha Havaman Andaj)…

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Read Marathi WhatsApp Contact

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उत्तर भारतात आपले ठाण मांडले होते. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वातावरणात चांगलाच बदल बघायला मिळाला. दिल्ली व आसपासच्या काही भागांमध्ये 8 फेब्रुवारीला (मंगळवारी) जोरदार पाऊस झाला. तसेच उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. उत्तर भारतातील पावसाचे संकट अजून संपले नसतानाच आता हे संकट महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.(Chance of heavy rain in ‘these’ districts with thunderstorms and strong winds)…

हे पण वाचा

आजचे सोयाबीन बाजार भाव

राज्यातील नागपूरमध्ये बुधवारी (दि.09 फेब्रुवारी रोजी) वातावरणात मोठा बदल जाणवला, दिवसभर ढगांची चादर पसरलेली होती. हवामान खात्याने विदर्भातील भंडारा, गोंदीया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशा प्रकारच्या जोरदार पावसाने महाराष्ट्रातील शेतकरी सतत झोडपला जात आहे. त्यामूळे “संकट इथले संपत नाही” अशीच स्थिती सध्या दिसत आहे.

Leave a Comment