काय सांगता! मुंबईत 2 BHK फ्लॅट फक्त एवढ्या लाखात; या नवीन लोकेशन वर स्वस्त फ्लॅट; पहा लोकेशनसह सॅम्पल फ्लॅट..!

2 BHK Flats Mumbai : मुंबईत 2 बीएचके घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तेवढे बजेट नाही, तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण मुंबईतील अशा लोकेशन बद्दल माहिती पाहणार आहोत जिथे 2 बीएचके फ्लॅट देखील कमी किमतीत उपलब्ध आहे. मुंबईत या नवीन लोकेशन वर 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅट (2 BHK flats Mumbai) अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. त्यामुळे आता याठिकाणी सामान्य लोक सुद्धा 2 बीएचके घर खरेदी करू शकतात. मुंबईत ही प्रॉपर्टी नेमकी कुठे उपलब्ध आहे? आणि तिथे किंमती नेमक्या काय आहे? याची सविस्तर माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत..

मुंबईत घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी पैश्यांचं बजेट किती आहे याचा विचार अगोदर करावा लागतो. कारण मुंबईत बर्‍याच ठिकाणी 1 बीएचके फ्लॅट देखील (1 BHK Flats Mumbai) सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. भरपूर सुविधा असलेल्या चांगल्या लोकेशन वर फ्लॅटच्या किंमती कोटी जवळपास आहे. अशा ठिकाणी 2 बीएचके आणि 3 बीएचके फ्लॅट कोटीच्या पुढे मिळतात. अशा परिस्थितीत सामान्य लोक 2 बीएचके सारख्या मोठ्या घराचे स्वप्नही पाहू शकत नाही. पण जर तुम्ही मुंबई जवळील नव्याने विकसित होणार्‍या लोकेशन वर घर घेतले तर तिथे नक्कीच तुमच्या बजेटमध्ये मोठे घर म्हणजेच 2 बीएचके फ्लॅट सुद्धा मिळू शकतो.

येथे वाचा – खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

नव्याने विकसित होणार्‍या ठिकाणी घर का घ्यावे?

नवी मुंबईतील वाशी 1990 मध्ये नव्याने विकसित होत असताना त्यावेळी तेथील प्रॉपर्टीच्या किंमती कमी होत्या, सुरूवातीच्या काळात तिथे चांगली कनेक्टिव्हिटी नव्हती, लोकल ट्रेनची सुविधा नव्हती. त्या काळात वाशीचा भविष्यात चांगला विकास होईल याची कल्पना लोकांना नव्हती. त्यामूळे तेव्हा वाशीत प्रॉपर्टीच्या किंमती कमी होत्या. पण जसाजसा तिथे विकास झाला तशा किमतीही वाढत गेल्या. म्हणूनच काही रिअल इस्टेट अभ्यासक नव्याने विकसित होणाऱ्या भागात प्रॉपर्टी घेण्याचा सल्ला देतात. त्याचे कारण म्हणजे सुरूवातीच्या काळात त्याठिकाणी घरांच्या किंमती कमी असतात. सध्या पनवेल जवळ असेच एक लोकेशन विकसित होत आहे. जेथे प्रॉपर्टीच्या किंमती सध्या परवडणाऱ्या आहेत. चला पाहूया लोकेशनसह, सॅम्पल फ्लॅट आणि फ्लॅटच्या किंमती..

येथे वाचा – नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

पहा लोकेशनसह, सॅम्पल फ्लॅट आणि फ्लॅटच्या किंमती

अलीकडच्या काळात पनवेल जवळ असलेले एक लोकेशन नव्याने विकसित होत आहे. ते लोकेशन म्हणजे रसायनी. पनवेल नंतर चांगल्या पद्धतीने विकसित होणारे रसायनी हे लोकेशन आहे. रसायनीत भाडे उत्पन्न देखील (Rental income) चांगले मिळते. रसायनी हे लोकेशन मुंबई पुणे जुना हाय वे आणि कोकण हाय वे या रस्त्याच्या मध्ये येते. सध्या रसायनीमध्ये सुरू असलेल्या क्रिकाॅन ग्रुप प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या किंमती परवडणाऱ्या आहेत. क्रिकाॅन ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे. त्यांना बांधकाम क्षेत्रात 21 वर्षाचा अनुभव असल्याची माहिती प्रॉपर्टी कवरेज या चॅनल वर देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया रसायनी मधील फ्लॅटच्या किंमती आणि पाहूया सॅम्पल फ्लॅट..

येथे वाचा – मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

रसायनीतील फ्लॅटच्या किंमती (2 BHK Flats Rasayani, Mumbai)

रसायनीत फ्लॅटच्या किंमती परवडणाऱ्या आहेत. याठिकाणी 1 बीएचके फ्लॅटची किंमत 22 लाखांपासून सुरू होते. तर 2 बीएचके फ्लॅट 33 लाखांत खरेदी करू शकता. मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत या किंमती खूपच कमी आहे. त्यामुळे आता मुंबई जवळ कमी किमतीत 1 आणि 2 बीएचके फ्लॅट खरेदी करता येणार आहे. या प्रोजेक्ट मधील सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

Leave a Comment