आता स्वप्नातलं घर शक्य; या बँकेतून स्वस्तात होम लोन घेऊन करा घराचे स्वप्न पूर्ण, पहा बँकांची यादी..!

Cheap Home Loan : अलीकडे नवीन आणि अलिशान घरं बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे. सामान्य परिस्थिती असलेला व्यक्ती देखील सिमेंट काँक्रेटचं घर बांधतोय तसेच मुंबईमध्ये फ्लॅट (1 bhk flat Mumbai) खरेदी करत आहे, यामागचे खरे कारण म्हणजे होम लोन (Home Loan). आज बर्‍याच बॅंका नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी तसेच नवीन घर विकत घेण्यासाठी स्वस्त होम लोन (Cheap Home Loan) देतात.

या होम लोन सुविधेमूळे सामान्य माणसाला सुद्धा घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे होम लोन घेत असताना कोणती बँक स्वस्त होम लोन देते? याची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपन सर्वात स्वस्त होम लोन देणारी बँक कोणती आहे, हे पाहणार आहोत.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

या बॅंका देतात स्वस्तात होम लोन (Cheap Home Loan)

ज्या बॅंका आपल्याला स्वस्त व्याज दरात होम लोन देतात अशा बँकांमधून होम लोन घेणे फायद्याचे ठरते. पण अनेकांना याची माहिती नसल्याने ते जास्त व्याज दर असलेले होम लोन घेतात, ज्यामुळे पुढील काळात जास्तीचा पैसा आपल्याला बँकेत भरावा लागतो. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण स्वस्तात होम लोन देणार्‍या बँकेची माहिती घेणार आहोत. या बॅंकांची यादी पुढील प्रमाणे

(1) पंजाब नॅशनल बँक : PNB म्हणून ओळखली जाणारी पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देत आहे. या बँकेच्या माध्यमातून नागरिकांना 8.40 टक्के ते 10.60 टक्के वार्षिक या दराने होम लोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही या बँकेतून होम लोन घेऊ शकतात.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

(2) स्टेट बँक ऑफ इंडिया : SBI या नावाने ओळखली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन लोन योजना (Loan Scheme) आणत असते. SBI बँक आपल्या ग्राहकांना सवलतीच्या दरामध्ये होम लोन उपलब्ध करून देते. ही बँक होम लोनवर ग्राहकांकडून 8.60 टक्के ते 9.45 टक्के या दराने व्याज घेते. महत्त्वाचं म्हणजे होम लोनचे व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून असते. यात लोनची रक्कम आणि कालावधी तसेच क्रेडिट स्कोअर या गोष्टी तपासून बँक व्याजदर ठरवते.

येथे वाचा – याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

(3) HDFC बँक : ही बँक खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक असून या बँकेचे देखील लाखो खातेधारक आहे. ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत असते आणि स्वस्तामध्ये विविध लोन उपलब्ध करून देते. या बँकेच्या होम लोनचा वार्षिक व्याजदर 8.50 टक्के ते 9.40 टक्के असा आहे.

(Important – बँकांचे व्याजदर काळानुसार बदलत असतात, त्यामुळे सध्या लोनचा व्याजदर काय आहे हे पाहण्यासाठी बॅंकेला भेट द्या.)

Leave a Comment