घर घेण्याचा विचार करताय? तर मग पहा सध्या स्वस्त होम लोन देणार्‍या बँकांची यादी..!

Cheap Home Loan : गेल्या काही वर्षांत मालमत्तेची मागणी वाढल्यामुळे घराच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत घर बांधणे असो वा घर खरेदी असो, माणसाची आयुष्यभराची संपूर्ण बचत खर्च होते. एवढेच नाही तर बर्‍याच लोकांना होम लोन (Home Loan) देखील घ्यावे लागते. जास्तीत जास्त लोकांनी होम लोन घ्यावे यासाठी सरकार देखील होम लोनवर भरपूर लाभही देते. काही बॅंका लोकांना स्वस्त होम लोन (Cheap Home Loan) देतात तसेच सरकारकडून त्यांना आयकरात सूटही दिली जाते. चला तर मग सध्या स्वस्त होम लोन देणार्‍या बॅंका कोणत्या आहे हे जाणून घेऊया…

जेव्हा एखादी व्यक्ती होम लोन घेते तेव्हा त्याचा परतफेडीचा कालावधी काही वर्षांचा नसून 20-30 वर्षांचा असतो. अशा परिस्थितीत माणसाचे जवळपास अर्ध्ये आयुष्य केवळ होम लोन फेडण्यातच जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला व्याजदरात थोडासाही दिलासा मिळाला, तर तुम्ही दीर्घकाळासाठी खूप मोठे पैसे वाचवू शकता. म्हणून होम लोन घेत असताना व्याजदराकडे (Interest rate) विशेष लक्ष द्यावे. याठिकाणी आपण स्वस्तात होम लोन (Cheap Home Loan) देणाऱ्या टॉप 10 बँका कोणत्या आहे? आणि त्यांचा व्याजदर काय आहे? हे जाणून घेणार आहोत.

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

होम लोन देणार्‍या टॉप 10 बॅंका आणि त्यांचे व्याजदर (Home Loan)
  1. HDFC बँक 8.5% (सर्वोच्च दर – 9.4%)
  2. इंडियन बँक 8.5% (सर्वोच्च दर – 9.9%)
  3. पंजाब नॅशनल बँक 8.5% (कमाल दर – 10.1%)
  4. इंडसइंड बँक 8.5% (कमाल दर – 10.55%)
  5. बँक ऑफ इंडिया 8.5% (कमाल दर – 10.6%)
  6. IDBI बँक 8.55% (कमाल दर – 10.75%)
  7. बँक ऑफ महाराष्ट्र 8.6% (कमाल दर – 10.3%)
  8. बँक ऑफ बडोदा 8.6% (कमाल दर – 10.5%)
  9. SBI मुदत कर्ज 8.7% (कमाल दर – 10.8%)
  10. युनियन बँक ऑफ इंडिया 8.7% (सर्वोच्च दर – 10.8%)

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment