मिरची पीक संकटात; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार?

शेअर करा

खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामूळे खरिपात पावसाने व्यवस्थित साथ द्यावी अशी प्रतेक शेतकर्‍याची इच्छा असते. पण यावर्षी पेरण्या झाल्यापासून नको असलेला पाऊस होत आहे.

या पावसाने अक्षरशः धूमाकूळ घातलेला आहे. त्यामूळे बहुतांश पिके पाण्यात आहे. या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. या हंगामात धान पिके तर पाण्यात आहेच पण त्यासोबतच काही भागातील शेतकरी ज्या भाजीपाला वर्गीय पिकाच्या उत्पादनावर अवलंबून असतात अशा मिरचीच्या पिकाला देखील चांगलाच फटका बसला आहे.

बर्‍याच जिल्ह्यात शेतकरी इतर मुख्य पिकांसोबत मिरची वर देखील अवलंबून असतात. या वातावरणामूळे मिरची पिकावर मर रोगाचे प्रमाण वाढले आहे. या मर रोगामूळे मिरचीचे पीक पूर्णपणे उध्वस्त होत आहे.  हे पाहून शेतकर्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण त्यावर केलेला खर्च देखील वसूल झालेला नाही.

दुबार पेरणी शिवाय पर्याय नाही..

निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा चांगलाच अनुभव यावर्षी शेतकर्‍यांना आलेला आहे. मुख्य पिकांची दुबार पेरणी करून देखील ते संकटात आहे त्यातच आता शेतकरी ज्या भाजीपाला पिकावर अवलंबून असतात त्या मिरची पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन अधिकची भर पडली. त्यामूळे शेतकर्‍यांना मिरचीची दुबार पेरणी करण्याशिवाय  पर्याय उरलेला नाही..

मिरची उत्पादक शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची मागणी

शेतकर्‍यांची पिके जर अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आली किंवा कोरडा दुष्काळ पडला तेव्हा अशा नैसर्गिक आपत्तीमूळे नुकसान झालेल्या पिकांना पीक विम्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत करण्यात येते. पण यामध्ये मुख्य पिकांचाच समावेश असतो.

आज बरेच शेतकरी मुख्यतः मिरची पिकावर देखील अवलंबून असतात. मात्र मिरची पिकासाठी अशा प्रकाराची काही तरतूद नसल्यामुळे मदत कुणाला मागावी हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

मिरचीचे नुकसान झाल्यास मिरची उत्पादक शेतकर्‍यांना देखील मदत मिळावी अशी मागणी सध्या मिरची उत्पादक शेतकरी करत आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का? आणि या विषयी शासन काय निर्णय घेईल? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.