मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, जाणून घ्या कारण..!

2 BHK Flats Mumbai : सध्या मुंबईत अनेक जण घराच्या शोधात आहे. बर्‍याच लोकांना राहण्यासाठी घर घ्यायचे आहे, तर काहींना पुढे भाव वाढतील म्हणून मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करायचे आहे. जर तुम्ही राहण्यासाठी आणि पुढे भाव वाढतील या दोन्ही कारणांसाठी घर घेत असाल तर घर खरेदी करत असताना त्याठिकाणी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. किंवा भविष्यात त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण होतील असे वातावरण पाहिजे. आता मुंबईतील काही भागात अशी प्रॉपर्टी (Property in Mumbai) तुम्हाला घेण्याची संधी मिळत आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक या ब्रिजच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झालं. या MTHL सागरी पुलामुळे आता मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरच फक्त जोडली जाणार किंवा तास भराचा प्रवास काही मिनिटांवर येईल असं नाही, तर या सागरी पुलामुळे आता बराच काही बदलाव दिसणार आहे. अटल सेतू असं नाव देण्यात आलेला हा पूल नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे.

या अटल सेतू पुलामुळे आता मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Real Estate Mumbai) मोठा बदल होणार आहे. एखाद्या पडीक जागेवर इमारत बांधल्यानंतर त्या जागेला तेवढा भाव नसतो, जेवढा त्याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा आल्यानंतर वाढतो. आता या अटल सेतू पुलामुळे नवी मुंबईच्या आसपास असलेल्या काही भागांमधील जागांचे व घरांचे दर बदलणार आहे.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

या सागरी पुलामुळे नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे फक्त काही मिनिटांत गाठता येणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत घर (2 BHK Flats Navi Mumbai) घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा सागरी पुल देशातील सर्वात मोठा सागरी पूल (Sea bridge) आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सागरी पूलामूळे 2 तास करावा लागणारा प्रवास हा चक्क 20 मिनिटांवर येणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल एक इंजिनिअरींगचा चमत्कार असून आधुनिक युगातील एक क्रांतीच आहे. या जबरदस्त कनेक्टिव्हिटीमूळे नवी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट बदलणार असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार (2 BHK Flat Mumbai)

महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे आधीच जागांचे व घरांचे दर वाढले होते. आता सागरी पूल चालू झाल्यामुळे त्यात अजून वाढ होईल असा अंदाज आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे तयार होत आहे. त्यामुळे याचा देखील जागांच्या व घरांच्या दरांवर मोठा परिणाम होणार. आता पुढील काळात नवी मुंबई आणि पनवेल या भागात बांधकाम व्यवसायाला अधिक गती मिळणार आहे. आता येत्या काळात पनवेल आणि उलवे या भागांमध्ये मोठा विकास होणार आहे. त्यामुळे याठिकाणी घरांची मागणी वाढेल असा अंदाज मंजू यागनिक यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. याठिकाणी घर घेणे भविष्यात फायद्याचे असणार आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

1 thought on “मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, जाणून घ्या कारण..!”

Leave a Comment