नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

1 BHK Flat Cidco Navi Mumbai : सध्या मुंबईत आपल्या बजेटमध्ये घर खरेदी करणे कठीण झाल्याचं दिसून येतय. त्यात पुन्हा दिवसेंदिवस मुंबईत घरांच्या किंमती वाढत असल्याने मुंबईतील घरे (Flats in Mumbai) सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबईत 1 बीएचके घराची किंमत सुद्धा डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सामान्य लोक बँकेकडून होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. पण हे लोन फेडता फेडता त्यांचे अर्ध्य आयुष्य निघून जातं. त्यामुळे मुंबईत घर खरेदी करणं सोपं नसल्याचं दिसून येतं. पण आता तुम्हाला मुंबईत तुमच्या बजेटमध्ये घर घेता येणार आहे. नवी मुंबईत सिडकोचे 1 बीएचके घर (1 BHK Flat Cidco Navi Mumbai) अवघ्या 20 लाखात मिळणार आहे. नवी मुंबईत सिडकोचा हा 20 लाखाचा 1 बीएचके फ्लॅट नेमका कुठे आहे? चला जाणून घेऊया लोकेशनसह संपूर्ण माहिती..

सिडकोची 3 हजार 322 एवढ्या घरांची सोडत 26 जानेवारीच्या मुहूर्तावर जाहीर झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सोडतीमध्ये EWS आणि LIG या दोन उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यात EWS गटातील कमीत कमी किंमत असलेला फ्लॅट हा 20 लाखात मिळणार आहे. हा फ्लॅट नेमका कुठे आहे? याची माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सिडकोचे 20 लाखाचे घर कुठे? (Cidco Flat)

सिडकोची ही स्वस्त घरे नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजामध्ये आहे. तळोजा सेक्टर क्रमांक – 21, तळोजा सेक्टर क्रमांक – 22 तसेच तळोजा सेक्टर क्रमांक – 37 अशा नोड्समध्ये ही EWS उत्पन्न गटातील घरे आहेत ज्यांची किंमत 21 लाख 71 हजार रुपये आहे. अशा किमतीत ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण शासनाकडून अडीच लाखाचे अनुदान मिळणार असल्याने ही घरे 19 लाख 21 हजार रुपयात पडणार आहे. त्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि अजून काही खर्च पकडल्यास ही घरे तुम्हाला 20 लाखात मिळणार आहे. ज्या लोकांना कमी बजेटमध्ये छोटे घर हवे असेल ते या लॉटरीसाठी अर्ज करू शकता.

मुंबईत चक्क 323 स्क्वेअर फुटामध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत पाहिली का? येथे क्लिक करून पहा बातमी..

सिडको लॉटरी अर्ज 2024 (Cidco Lottery Application 2024)

सिडकोच्या या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी शुभारंभ 26 जानेवारी 2024 पासून झालेला आहे. नवी मुंबईत सिडकोचे घर बजेटमध्ये मिळत आहे. या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर आधार कार्ड आणि पॅन कार्ड टाकून नाव नोंदणी करून घ्यावी.

या लॉटरीबाबत अधिक माहिती
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment