सिडको लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? येथे पहा माहिती..

1 BHK flat Navi Mumbai : मुंबईकरांनो! कमी किमतीत हक्काचं चांगलं घर पाहिजे? तेही मेट्रो आणि सागरी सेतू पुलाजवळील भागात, तर मग आता जबरदस्त कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईत घर (1 BHK Flat Mumbai) खरेदी करत असताना त्याठिकाणी चांगल्या सुविधा आहे का हे सर्वात अगोदर पाहिलं जातं. ज्या ठिकाणी आपण घर घेतोय तिथे जवळपास रस्ते, बस स्टँड, मेट्रो तसेच इतर सुविधा असणे आवश्यक आहे, या सुविधा नसतील तर रोजच्या जीवनात अनेक अडचणी येतात. पण आता नवी मुंबईत मेट्रो व सागरी सेतू जवळील भागात तुम्हाला सिडकोचे स्वस्त घर (Cidco Flats Navi Mumbai) घेता येणार आहे. सिडकोच्या या घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज कसा करावा? आणि अर्ज करत असताना काही अडचणी आल्यास संपर्क नेमका कुठे करावा? याची माहितीही आपण याठिकाणी पाहणार आहोत.

मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडको आणि म्हाडासारख्या संस्थांची मोठी मदत होत आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी परवडणाऱ्या घरांच्या शोधात असणाऱ्यांना म्हाडा-सिडकोमूळे घरं मिळत आहे. आता नवी मुंबईत घर खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सिडको पुन्हा एकदा तारणहार ठरणार आहे. कारण सिडकोकडून नवी मुंबईत नव्यानं हजारो घरे (Cidco Flats Navi Mumbai) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तळोजा येथे असलेल्या नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या सागरी सेतू (MTHL) पासून अगदी जवळच्या भागात हजारो घरं विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सिडकोची सोडत यादिवशी काढली जाणार

सिडको महामंडळाकडून देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर महागृहनिर्माण योजना 2024 (Housing Scheme 2024) चा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 3 हजार 322 घरं विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सिडकोच्या या घरांसाठी 26 जानेवारी 2024 पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला 30 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. या योजनेची सोडत 19 एप्रिल 2024 या दिवशी काढण्यात येणार आहे. 

मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

सिडकोच्या या हजारो घरांपैकी द्रोणागिरी नोडजवळील 61 घरे तसेच तळोजा नोड येथे असलेली 251 घरे मिळून 312 एवढी घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता उपलब्ध असणार आहेत. तर, द्रोणागिरी येथे असलेली 374 एवढी घरे तसेच तळोजा येथील 2 हजार 636 घरे मिळून 3 हजार 10 एवढी घरे इतर सर्वसाधारण घटकांकरिता उपलब्ध असणार आहेत. 

सिडको लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for Cidco Lottery 2024)

(1) सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या घरांसाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://lottery.cidcoindia.com या वेबसाईटवर यावं लागेल.

(2) त्यानंतर वेबसाईटवर आल्यानंतर सिडकोच्या घरांची जाहिरात दिसून येईल. त्याखाली Go नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

(3) त्यानंतर या सिडको लॉटरीचा मुख्य पेज ओपन होईल. त्यानंतर Register या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरा आणि मोबाईल वर आलेला OTP टाका. त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार होईल.

मुंबईत चक्क 323 स्क्वेअर फुटामध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत पाहिली का? येथे क्लिक करून पहा बातमी..

(4) पुढे अजून एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल

(5) रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर Apply नावाचे ऑप्शन तुमच्या समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. त्यात संपूर्ण माहिती भरा, जसे की कोणत्या योजनेत फॉर्म भरायचा आहे, कोणत्या सेक्टरमध्ये भरायचा आहे.

(6) ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट वर (Submit) क्लिक करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल होईल.

(7) अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता.

हा फॉर्म भरताना काही माहिती चुकली असेल तर पेमेंट करण्यापुर्वी त्याला एडिट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर एडिटचे ऑप्शन मिळणार नाही. नोंदणी आणि अर्ज करताना काही समस्या येत असेल तर 7065454454 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Leave a Comment