खुशखबर! मुंबईत सिडकोचे घर फक्त 22 लाखात; आता स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Cidco Flats Navi Mumbai : मुंबईत फक्त 22 लाखात घर घेण्याचे स्वप्न आता सिडको पूर्ण करत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत घरांचे दर कोटीच्या घरात गेलेले असताना एवढ्या स्वस्तात मुंबईत घर होणार म्हटल्यावर आनंद तर होणारच (Affordable Flats Mumbai). चला पाहूया संपूर्ण बातमी..

मुंबईत अटलसेतू पुलामूळे मुंबई आणि नवी मुंबई हे दोन्ही शहर जोडले गेले आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहराच्या मधल्या भागांना खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. या अटलसेतू पुलामूळे या भागातील रिअल इस्टेटचे (Real Estate) दर वाढले आहे. या पुलामूळे नवी मुंबईतील द्रोणागिरीला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. आता या भागातील घरांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामूळे या भागात स्वस्तात घर मिळावे अशी अनेकांची इच्छा आहे. आता हे स्वप्न सिडको पूर्ण करत आहे. सिडकोकडून आता द्रोणागिरी आणि तळोजामध्ये फक्त 22 लाखात घर मिळणार आहे (Cidco Flats Navi Mumbai). या घरांसाठी अर्ज कधीपासून करता येणार? हे जाणून घेऊया..

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

घरांसाठी या तारखेपासून करा ऑनलाईन अर्ज (Cidco Flats Online Application)

आता सिडकोने नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats Navi Mumbai) खरेदी करण्याची संधी सर्व सामान्यांना दिली आहे. सिडको महामंडळाकडून द्रोणागिरी तसेच तळोजा या परिसरातील हजारो सदनिकांच्या सोडतीची घोषणा करण्यात आली असून घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना 30 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना हे अर्ज 27 मार्च पर्यंत करता येणार आहे. या सोडतीत लाभार्थ्यांना द्रोणागिरी सेक्टर 11 आणि 12 या परिसरामध्ये फक्त 22 लाख ते 30 लाख रुपयांमध्ये घर घेण्याची संधी मिळाली आहे.

मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

आर्थिक दुर्बल घटकाकरिता 25.81 एवढे चौरस मीटर असलेली सदनिका 22 लाख 18 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 29.82 एवढे चौरस मीटर असलेली सदनिका 30 लाख 17 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळोजा नोडमधील सेक्टर 21, 22, 27, 34, 36 आणि 37 या परिसरामधील सदनिकांचा (Cidco Flats) यामध्ये समावेश आहे. महत्वाचं म्हणजे या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे फक्त 22 लाख ते 34 लाख रुपयांमध्ये या सदनिका सोडतीच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत. सिडकोच्या घरांच्या या लॉटरीबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्या.

या घरांबद्दल अधिक माहिती
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment