दिवाळी, दसऱ्याला नव्या घरात; नवी मुंबईत सिडकोच्या घरांना मोठा प्रतीसाद, घर मिळवण्याची मोठी संधी?

Navi Mumbai : मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने याला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र सिडकोकडून (Cidco Lottery 2023) उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईला (Navi Mumbai) गेल्या काही वर्षांमध्ये वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी नवी मुंबईतील घरांच्या (2 bhk flat in Navi Mumbai) किमती गगनाला भिडल्या आहेत. याच कारणामुळे येथील सर्वसामान्य लोकांना नवीन घर खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. असे असून देखील सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईत मात्र आज देखील काही प्रमाणात बजेटमधील घरांची (Budget Friendly Flats) संकल्पना सुरू आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घर घेत असलेले लोक याच भागामधील गृहप्रकल्पांना जास्त पसंती देत आहेत.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील घरांच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत; पण सिडको अधिकार क्षेत्र म्हणजेच दक्षिण नवी मुंबईमधील द्रोणागिरी, तळोजा, नवीन पनवेल, उलवे, पुष्पकनगर, करंजाडे, कळंबोली आणि कामोठे या भागामध्ये आज देखील घरांच्या किमती तुलनात्मकदृष्ट्या सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आहेत. त्याच पद्धतीने बजेटमध्ये असलेल्या घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये देखील स्वस्त घरे (Affordable Flats) उपलब्ध आहेत.

सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

कर्जत, द्रोणागिरीला अधिक पसंती : कर्जत तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. याच कारणामुळे येथील जमिनीचे दर देखील वाढले आहेत. मोठमोठ्या विकासक कंपन्यांकडून या भागामध्ये टाउनशिप उभारण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने दळवळणाच्या यंत्रणा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असणार्‍या घरांना जास्त मागणी आहे. गेल्या बर्‍याच वर्षापासून रखडलेल्या दोणागिरी तोडच्या भागामध्ये बरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. म्हणूनच दसरा आणि दिवाळी या सनांच्या मुहूर्तावर याठिकाणच्या घरांना जास्त पसंती दिली जात आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

टू बीएचकेला सर्वात जास्त मागणी (2 bhk flat in Navi Mumbai)

तळोजा, उलवे, दोणागिरी आणि करंजाडे या सिडको नोडसह कर्जत विभागामधील घरांच्या किमती जरा कमी आहेत. त्यामुळे बजेटमध्ये मिळत असणार्‍या टू बीएचकेच्या घराला (2 bhk flat in Navi Mumbai) जास्त मागणी दिसून आली. कोरोनाकाळानंतर ग्राहक खर्च करत असताना अधिक जागरुक झाला आहे. आपल्या बजेटचा अंदाज घेऊनच ग्राहक घर खरेदी करतो. सध्याच्या स्थितीमध्ये नवी मुंबई पालिका क्षेत्राबाहेर टू बीएचकेचे दर (2 bhk flat price) कमी असल्याने याच घरांना जास्त मागणी आहे.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

नवी मुंबई विभागामध्ये घरांच्या किमती तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्या तरी गेल्या काही वर्षापासून त्या स्थिर आहेत. त्यामुळे वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांना स्वप्नामधील घर खरेदीकरिता बाहेर पडताना दिसत आहे. अलीकडच्या परिस्थितीमध्ये तळोजा, कामोठे, करंजाडे, उलवे, द्रोणागिरी, कर्जत आणि पुष्पकनगर या परिसरामधील घरांना जास्त मागणी आहे. दीपेश यादवराव (प्रॉपर्टी कन्सल्टन्ट)

सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

(Disclaimer : वरील माहिती इंटरनेटवर मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे, कृपया घरांसंदर्भात काही निर्णय घेण्यापूर्वी सखोल माहिती काढावी.. धन्यवाद)

Leave a Comment