आवडीचे घर निवडण्याची संधी; पहा सिडकोच्या आगामी लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे..!

2 Bhk Flat in Navi mumbai : पुढील चार वर्षांमध्ये सिडकोच्या माध्यमातून तब्बल 87 घरांची निर्मिती होणार आहे. त्यापैकी चालू वर्षांमध्येच 41 हजार घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे (2 bhk flat in navi mumbai). यामधील विशेष भाग म्हणजे प्रथम येणारस प्राधान्य अशा तत्वावर या सर्व घरांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी घेतला आहे.

एकूण 41 हजार घरांपैकी जवळपास एकवीस हजार घरे तळोजा नोडमध्ये असणार आहेत (1 bhk flat in navi mumbai). मेट्रो व इतर दळणवळणाच्या सुविधांसोबतच इतर प्रस्तावित दर्जेदार अशा महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमुळे खारघर विभागातील तळोजा नोडला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात घ्या घर; स्वस्तात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 17 हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विविध कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दळणवळणाच्या सुविधा, रुंद रस्ते, क्रीडांगण इत्यादी सोबतच पाणीपुरवठा यावर या ठिकाणी विशेष भर दिला आहे. आगामी काळामध्ये या ठिकाणी असलेल्या घरांना अधिक पसंती मिळेल असा विश्वास सिडको ने दाखवला आहे (ready to move flat in navi mumbai). लवकरच ही लॉटरी जाहीर होणार असून या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आपल्याला अर्ज करत असताना करावी लागणार आहे. याविषयी आपण पुढे सविस्तरपणे पाहूया.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

आवश्यक कागदपत्रे (1 bhk flat in navi mumbai)

अर्ज करत असताना अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला किंवा गत वर्षातील आयकर विवरण पत्र, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे फोटो इत्यादी कागदपत्राची पूर्तता अर्ज करत असताना करावी लागणार आहे.

आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे;

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करत असताना अनुसूचित जाती, सोबतच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी, यासोबतच भटक्या, विभक्त जमातीसाठी नमुना प्रतिज्ञापत्र ए प्रमाणे भारत देशात कुठेही पक्के घर नसल्याचा पुरावा, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असल्याचा पुरावा म्हणजे उत्पन्नाचा दाखला (1 bhk flat in navi mumbai), सामाजिक प्रवर्गाचा म्हणजेच जातीचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र सोबतच डोमिसाईल सर्टिफिकेट, आदिवासी प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली असल्याचा पुरावा..

काय सांगता! सामान्यांसाठी दोन लाख घरे; आता स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार, येथे क्लिक करून पहा बातमी..

सर्वसमावेशक म्हणजेच खुल्या प्रवर्गातील गटांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे;

नवी मुंबईमध्ये हक्काचे घर नसल्याचा पुरावा, वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, सोबतच सामाजिक प्रवर्गाचा उल्लेख असलेल्या नमूना प्रतिज्ञापत्र बी प्रमाणे नोटरी प्रतिज्ञापत्र या ठिकाणी लागणार आहे.

शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचारी किंवा सिडको सोबतच महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे महामंडळे किंवा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय कर्मचारी ज्यांनी कमीत कमी पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असेल, त्यांच्यासाठी शासकीय कार्यालयातील ओळखपत्र, सोबतच ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तेथील शासकीय विभागाच्या लेटरहेडवर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेली सही सोबतच शिक्का असलेले प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.

अरे वा! म्हाडाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा..

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी;

राज्य माहिती महासंचालया अंतर्गत किंवा सिडकोच्या कार्यालया अंतर्गत दिलेल्या पत्र दोन स्व साक्षांकित केलेले पत्र, राज्यभारातील पत्रकारांसाठी सादर करावे लागेल.

धार्मिक अल्पसंख्याक नागरिकांसाठी नमुना प्रतिज्ञापत्र इ प्रमाणे नोटीस जाहीर केलेले प्रमाणपत्र.

राज्यातील प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी;

राज्यातील प्रकल्पग्रस्त दाखला असलेल्या नागरिकांसाठी वंशावळ स्पष्ट करणारे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सोबत अवार्ड कॉपी आणि सातबारा उतारा किंवा प्रकल्पग्रस्त असल्यास संबंधित कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा; भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून वाचा बातमी..

दिव्यांग नागरिकांसाठी;

40% शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांकरिता शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे. यामध्ये अंधत्व, श्रवणदोष, दृष्टीदोष, अस्थिव्यंग, बौद्धिक अपंगत्व, गतिमंद, बधीर, मनोरुग्ण, कुष्ठरोग इत्यादी बाबींचा विचार केला जाईल. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील नागरिकांकरिता सोबतच निमलष्करी दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता सेवा पुस्तिका किंवा ओळखपत्र किंवा या ठिकाणी जिल्हा सैनिक मंडळाचे संबंधित सक्षम प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यामध्ये इंडो तिबेटियन सीमा पोलीस, सशस्त्र सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, नौसेनेचे शासकीय कर्मचारी, सोबतच त्यांचे कुटुंबिक नागरिक, वायुसेना राष्ट्रीय सुरक्षा दल, इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल.

बाप रे! फक्त आठ महिन्यांत तब्बल 81 हजार मुंबईकरांनी घेतले हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कुठे आहे स्वस्त घरे?

तर विविध गटांसाठी विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी करावी लागणार आहे याविषयी आपण आज माहिती बघितली. सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे सादर करूनच अर्ज सबमिट करावा. कागदपत्रे सादर करत असताना काही चूक झाली असेल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी..

Leave a Comment