अरे व्वा! नवी मुंबईत मिळवा फक्त 12 लाखात घर; एवढीच घरे विक्रीस उपलब्ध; अर्ज प्रक्रिया सुरू; वाचा सविस्तर;

Navi Mumbai Cidco Flat : गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सिडकोणे घराची लॉटरी जाहीर केली आहे. पनवेल तसेच पनवेल परिसर या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. आजच्या या लेखांमध्ये आपण याच घरांच्या लॉटरी विषयी तसेच तेथील घरांच्या प्रकल्पाविषयी तपशील माहिती जाणून घेणार आहोत.

यामध्ये प्रयाग सिटी विहीघर हा एक सिडकोच्या या प्रकल्पामधील महत्त्वाचा भाग आहे. अनेक नागरिकांना हाच प्रश्न पडला होता की, या प्रकल्पाची स्थापना नक्की कोठे असेल? आणि याची लॉटरी कोठे लागणार आहे? तसेच या ठिकाणी घर घेणे फायद्याचे ठरेल का? असे विविध प्रश्न ग्राहकांच्या माध्यमातून विचारले जात होते (ready to move flat in navi mumbai). म्हणून आज आपण आजच्या लेखामध्ये प्रयाग सिटी बाबत तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत..

खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

पनवेलच्या 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये सिडको ने हे घर बांधले असून प्रयाग सिटी हा प्रकल्प प्रयाग बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पार पडेल. या प्रकल्पाचा महारेरा क्रमांक P52000004381 हा आहे आणि याच प्रकल्पाचे मूळ ठिकाण विहिघर पनवेल या ठिकाणी आहे.

एकूण 55 घरे प्रकल्पामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी एकूण दहा घरे असणार आहेत. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील व अल्प उत्पन्न प्रवर्गातील नागरिकांकरिता 45 घरे उपलब्ध करून दिले जातील (Cidco lottery latest news). या घराची किंमत फक्त 12 ते 20 लाखांपर्यंत आहे आणि सध्या ही सर्व घरे तयार स्थितीमध्ये उपलब्ध आहेत..

होम लोन घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा होईल मोठे नुकसान, येथे क्लिक करून पहा बातमी..

या प्रकल्पापासून पनवेलचे रेल्वे स्टेशन फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच डी मार्ट फक्त साडेसहा किलोमीटर अंतरावर असून पिल्लई कॉलेज हे देखील साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे (CIDCO Lottery 2023 Navi Mumbai). तसेच हायवे ड्रॉप पॉईंट जो मुंबई तसेच पुणे असा द्रुतगती महामार्ग आहे तो तर फक्त तीन किलोमीटर अंतरावरच आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती अशी सांगितली जात आहे की, प्रायव्हेट बिल्डर यांनी वन बीएचके फ्लॅट ची किंमत 28 लाख रुपये इतकी ठेवली असून टू बीएचके फ्लॅट ची किंमत चाळीस लाख रुपये इतकी ठेवले आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून फक्त बारा लाखांपासून वीस लाखांपर्यंत हे घर आपल्याला मिळू शकते. तुम्हाला जर हे घर घ्यायचे असेल तर सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल (Cidco lottery 2023 registration). सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असून त्वरित अर्ज करून तुम्ही या लॉटरी प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकता..

Leave a Comment