शेतकर्‍यांना दिलासा : हरभरा खरेदीला मिळाली ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ..!

शेअर करा

Read Marathi Online : काही दिवसांपूर्वी म्हणजेच 23 मे रोजी राज्यात हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत अचानकपणे हमीभाव केंद्रे बंद झाल्याने हरभरा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ज्या शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आपला हरभरा केंद्रावर आणला होता आणि नोंदणीही झाली होती पण खरेदी न झाल्यामूळे अशा शेतकर्‍यांना अधिकची मेहनत आणि अधिकचा खर्चही सहन करावा लागला..

केंद्रावरच पडून असलेल्या आपल्या हरभऱ्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवावं लागत होतं आणि विशेष म्हणजे हरभरा घेऊन आलेल्या आणि तिथेच गुंतून पडलेल्या गाड्यांचे भाडेही मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना द्यावे लागत आहे. अशा प्रकारे हमीभाव केंद्रे बंद झाल्यापासून खूपच दयनीय अवस्था शेतकर्‍यांची झाली होती. पण आता या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, राज्यात पून्हा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. (Consolation to the farmers, Extension received for purchase of gram)..

‘या’ तारखेपर्यंत खरेदी केंद्रे सुरू रहाणार

शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक असताना खरेदीच्या मुदतीपूर्वीच उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत नोंदणी बंद करण्यात आली. हरभरा शिल्लक असलेल्या शेतकर्‍यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामूळे हरभरा खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावी अशी मागणी सर्वच स्तरातून जोमाने सुरू झाली होती. परिणामी ही खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत. या खरेदी केंद्रांना 18 जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामूळे हरभरा उत्पादक शेतकर्‍यांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

येथे वाचा  – शेतकरी बांधवांनो सावधान ! बियाणे खरेदी करताना ‘ही’ चूक केल्यास कृषी विभागही तुमची मदत करू शकत नाही..!

हमीभाव केंद्रे बंद झाल्यामुळे खुल्या बाजारात शेतकर्‍यांची लूट

हमीभावाने खरेदी बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांकडे खुल्या बाजारात विक्री करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरला नव्हता. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी हरभऱ्याचे भाव पाडले होते. हमीभाव केंद्रे आणि खुल्या बाजारातील दरात मोठा फरक निर्माण झाला होता. जवळपास एक हजार ते 1500 रुपयांपर्यंत हा फरक होता. त्यामुळे खुल्या बाजारात आपला हरभरा विक्री करून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार होते. पण त्याला आता आळा बसलेला आहे.

आता नव्याने ‘एवढा’ टन हरभरा खरेदी करणार

अगोदर केंद्राद्वारे 67 लाख 13 हजार 534 क्विंटल एवढे उद्दिष्ट राज्याला देण्यात आले होते. पण हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदीला पूर्णविराम बसला होता. आता पुन्हा 7 लाख 46 हजार 460 टन एवढे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट नव्याने देण्यात आले आहेत.

दर्जेदार माहितीसाठी आमचा शेती विषयक WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.