दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती बिघडली; नरेंद्र मोदींना केजरीवाल यांचे पत्र..!

दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांचा संपुर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना बाधितांचे मोठे हाल होतांना दिसत आहे. अशी परिस्थिती आपल्या राज्यात उद्भवू नये म्हणुन त्या त्या राज्यांच्या सरकारांनी पंतप्रधानांकडे लक्ष देण्याची विनवणी सुरू केली आहे. देशातील बहुतांश राज्यांत बेड्स, ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळतय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी दिल्लीत रुग्णांसाठी बेड, ऑक्‍सिजन खुप मोठ्या प्रमाणात कमी पडत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत त्वरित 7 ते 10 हजार बेड्स रुग्णांसाठी राखीव देण्यात यावे. त्याच बरोबर ऑक्‍सिजनचा पुरवठाही करण्यात यावा असं अरविंद केजरीवालांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मागील १२ दिवसांत दिल्‍लीतील कोरोना रुग्‍णवाढीची टक्‍केवारी ८ वरुन १६.६९ एवढी झाली. असा उल्लेख अरविंद केजरीवालांनी या पत्रात केला आहे.

मागील 24 तासात 24 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. वाढती रुग्णसंख्येचा विचार करता दिल्ली मध्ये 7 हजार बेडची गरज आहे. सध्या अतिदक्षता विभागात फक्त 100 बेडची सुविधा आहे. त्वरित ऑक्‍सिजनचा पुरवठा करावा. मागील दोन दिवसांतच रुग्णांची टक्केवारी 24 टक्के वरुन 30 टक्क्यांवर आल्याची माहिती केजरीवालांनी दिली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment