बाप रे ! कापसाने आणले ‘अच्छे दिन’, शेतकरी म्हणतात ‘कापसाला सोन्याचा भाव’..!

यंदा कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे अच्छे दीन आले आहेत. कापसाला बर्‍याच वर्षानंतर हा सर्वोच्च दर प्राप्त होत आहे. यावर्षी जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर कापसाचे उत्पादन कमी झाल्याने कापसाची मागणी खूप वाढलेली दिसत आहे. कापसाचे सर्वात जास्त उत्पादन घेणार्‍या देशांच्या यादीत भारताचा एक नंबर लागतो तर दुसर्‍या क्रमांकावर चीन आहे. त्या पाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो.

जगात नंबर तीन वर सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या अमेरिकेत यावर्षी कापूस घेतल्या जाणार्‍या क्षेत्रात दुष्काळ पडला आहे. त्यामूळे येथील कापूस उत्पादन घटले आहे आणि त्या तुलनेत चीन व इतर देशांकडून मागणी खूपच आहे. याचा परिणाम कापूस बाजारावर होऊन भावात मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. भारतातही हीच परिस्थिती आहे, उत्पादनात मोठी घट आली आहे त्यामूळे देशांतर्गत कापसाला चांगला दर प्राप्त होत आहे. ‘कापसाला सोन्याचा भाव’ असं शेतकर्‍यांकडून ऐकायला मिळत आहे. त्यामूळे कापसाने शेतकर्‍यांना अच्छे दिन आणले आहेत असच म्हणावं लागेल.

पहा येथे मिळतोय कापसाला सर्वाधिक दर

यावर्षी सोयाबीन प्रमाणे कापसाची देखील टप्प्याटप्प्याने विक्री करण्यात आली त्यामूळे शेतकऱ्यांना कापसाला चांगले दर मिळाले. आणि आता तर कापूस सर्वोच्च दर प्राप्त करीत आहे. काल वर्धा जिल्ह्यातील सिंदी (सेलू) या बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला, येथे कापसाची 2222 क्विंटल आवक आली होती. जास्तीत जास्त दर – 13,450 रुपये, कमीत कमी दर – 8800 रुपये तर सर्वसाधारण दर – 13,250 रुपये होता.

आजचे सर्व ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या..धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.