कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल, यंदाही कापसाचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता..!

कापूस हे भारतातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. जगाच्या तुलनेत भारतात जास्तीत जास्त कापूस लागवड होते. जरी जगाच्या तुलनेत लागवड जास्त असली तरी एकरी कापूस उत्पादनात भारत मागे आहे. एकरी उत्पादनात चीन एक आघाडीचा देश आहे.

भारतात कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा आहे आणि खरच ही उपमा खरी ठरत आहे कारण या वर्षी कापसाला आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला आहे. या वर्षी कापसाला दहा ते बारा हजार प्रति क्विंटल एवढा उच्चांक्की दर मिळाला. पण शेतकऱ्याच्या मनाला सतत एकच प्रश्न पडत आहे तो म्हणजे कापसाचा हा दर येणाऱ्या वर्षी पण कायम राहणार का?

देशातील कापसाची मागणी वाढणार

वाढता उत्पादन खर्च आणि हाती येणारे कमी उत्पन्न या कारणांमुळे शेतकरी कापसाला पर्याय म्हणून सोयाबीन, मक्का, तूर इ. पिकांकडे वळत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात कापसाचे उत्पादन घटले असून कापसाची मागणी खूप वाढत आहे. तसेच कोविड नंतर ठप्प झालेला वस्त्र उद्योग आता पूर्ववत कार्यरत झाला आहे.

यंदा कापूस उद्योग 95% क्षमतेने कार्यरत राहण्याची शक्यता आहे. भारतातील सूत गिरण्यांना रोज 80 ते 85 हजार गाठींची गरज भासत असते. एका कापूस गाठीचे वजन साधारणतः 170 किलोग्राम असते. या वर्षी देशातील 1700 जिनिंग गती घेतील त्यामुळे कापसाची मागणी ही वाढतच जाणार आहे. देशातील कापूस गाठींचा साठा हा अत्यल्प राहिला आहे. त्यामुळे कापसाला स्थानिक बाजारपेठेतच जास्तीत जास्त मागणी राहण्याची शक्यता आहे. 

देशातील कापसाचे उत्पादन वाढणार

या वर्षी कापसाला मिळालेला उच्चांक्की दर पाहता सध्या शेतकर्यांना कापूस पिकातून सर्वाधिक उत्पन्न मिळण्याची आशा आहे. त्यामुळे या वर्षी भारतात मागील दोन वर्षांच्या तुलनेत कापसाची लागवड वाढणार आहे. साहजिकच लागवड वाढल्यामुळे कापसाचे उत्पादन वाढणार. तरी पण या वाढत्या उत्पादनाचे कापूस दरावर काहीच परिणाम होणार नाही याचे कारण आहे कापसाची वाढती मागणी आणि भारतीय वस्त्र उद्योगाची वाढलेली कार्यक्षमता. देशातील नव्या हंगामात जवळपास 400 लक्ष गाठीचे उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे.

शेजारील देशांकडून कापसाची मागणी वाढणार

भारताचा शेजारी देश चीन हा जगातील सर्वात मोठा कापूस आयातदार देश आहे. चीनचा कापूस साठा आता जवळपास संपत आला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील शीत युद्धामुळे त्यांचा व्यापार कमी झालेला आहे. त्यामुळे चीन भारताकडून जास्तीत जास्त कापूस आयात करण्याची शक्यता आहे. तसेच भारताचे इतर शेजारी राष्ट्र बांगलादेश, पाकिस्तान या देशांमधून पण कापसाला अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे.

चीन जगातील आघाडीचा वस्त्र उत्पादक देश असल्यामुळे त्याची गरज वाढतच जाणार आहे त्यामूळे चीनला कापससाठी भारताकडे यावे लागणार आहे. त्यामूळे येणाऱ्या हंगामात पण कापसाचे दर वाढलेलेच राहतील आणि पांढरे सोने चमकतच राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे…शेतीविषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment