टोमॅटो नंतर आता कापूस दराची जोरदार मुसंडी, भाव दहा हजार पार जाणार? Cotton rate

Cotton rate Maharashtra : देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. देशातील अनेक बाजारपेठेत कापसाचा भाव 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. वायद्यांनी देशभरात 60 हजारांचा आकडा पार केला. दुसरीकडे देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भाव चढे आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशाच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत कापूस 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढला आहे. मात्र सध्याच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही.

कारण बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. आता केवळ 3 ते 4 टक्के कापूस शेतकऱ्यांजवळ शिल्लक आहे. बहुतांश कापूस आता व्यापारी, साठेबाज करणारे ट्रेडर आणि कापड गिरण्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक प्रतिदिन 10,000 ते 12,000 गाठींवर पोहोचली. त्याचबरोबर सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी कपड्यांची मागणीही वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सूत आणि पर्यायी कापसाची मागणी वाढली आहे.

कापसाला मागणी वाढल्याने भावाला आधार मिळत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाचा सरासरी भाव 6,700 ते 7,800 रुपये प्रतिक्विंटल आहे. आता बाजार समित्यांमध्ये कमाल भाव 7500 रुपयांच्या पुढे गेला आहे. मागणी अशीच वाढत राहिल्यास कापसाचा भाव पुढील महिन्यात दहा हजार पार करेल असे जाणकार सांगत आहे.

वायद्यांमध्ये कापूस आता 60,000 हून अधिक वरच खेळतोय. आज सायंकाळपर्यंत कापूस वायदे क्विंटलमागे 60 रुपयांनी वाढून 60,500 रुपये झाले. गेल्या पाच दिवसांपासून वायद्यांमध्ये कापूस 60,000 च्या वरच राहिला आहे.

त्याचबरोबर देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी आहे. त्यात चालू महिन्यात पाऊस पडला नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांना ऑगस्टमध्ये पावसाचा फटका बसला. त्यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. यासोबतच भविष्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता कापूस बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली.

मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायदामध्ये अस्थिरता दिसून येत आहे. कापूस वायदा आज 2.5 टक्क्यांनी घसरून 85.67 सेंट प्रति पौंड होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीची पातळी एका टप्प्यावर स्थिरावलेली दिसते.

वाचा : घरकूल मिळत नसेल तर या नंबर वर करा कॉल, तुम्हालाही मिळू शकते घर..!

Leave a Comment