काय सांगता.. 10 रुपयाचे दही आता मिळणार 15 रुपयाला, कंपन्यांचा मनमानी कारभार..!

शेअर करा

अलीकडे सारखीच वाढत जाणार्‍या महागाईने सामान्य माणूस हैराण झालेला आहे. आता अशा परिस्थितीत दुग्धजन्य पदार्थांवर देखील जीएसटी(GST) लागू केल्या गेली आहे. परिणामी अगोदर 10 रुपयाला मिळणारा दह्याचा डबा(Packing) आता 15 रुपयांना मिळणार आहे. त्यामूळे सर्व सामान्य लोकं अस्वस्थ झाली आहेत.

केंद्र सरकारने(Central Government) मागील महिन्यात पहिल्यांदाच(First Time) दुधापासून बनवलेल्या पॅकेज्ड प्रोडक्ट्सला जीएसटीमध्ये घेतले आहे. 18 जुलै पासून दुग्धजन्य पदार्थांवर(Milky products) जीएसटी देशभर लागू केला गेला आहे. पॅकेज्ड दुग्धजन्य पदार्थांवर सरकारने 5 टक्के(Five Percent) जीएसटी निश्चित केला आहे. पण, कंपन्या आता किंमती 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहेत त्यामुळे याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे..

येथे वाचा – पैसाच पैसा : या वनस्पतीचे फळं आणि पाने विकून होते जबरदस्त कमाई, जाणून घ्या माहिती..!

सर्व मोठ मोठ्या कंपन्या पॅक्ड दही पुरवतात. Britannia कंपनी यापैकी एक कंपनी आहे. ही कंपनी  बाजारात वेग वेगळी पॅकिंग पुरवते. त्यामध्ये 80 ग्रॅम, 150 ग्रॅम आणि 400 ग्रॅम च्या पॅकिंगचा समावेश आहे.

आजपर्यंत बाजारात 80 ग्रॅम पॅक्ड दह्याची किंमत 10 रुपये होती. पण आजपासून तेच 80 ग्रॅम पॅक्ड केलेले ब्रिटानिया दही बाजारात 15 रुपयांना विकले जात आहे. म्हणजेच कंपनीने याची किंमत थेट 10 रुपयांवरून 15 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 10 रुपयांच्या दहीसाठी ग्राहकांना आता 5 रुपये शिल्लक द्यावे लागणार आहेत.

पॅक्ड दह्यावर सरकारने 5 टक्के जीएसटी(GST) लावला आहे. पण आता कंपन्या मनमानी सुरू केली आहे. जीएसटीचे कारण देत कंपन्यांनी किमतीमध्ये वाढ करायला सुरुवात केली आहे.

खरं बघायला गेलं तर 10 रुपयांच्या दह्याची किंमत 5 टक्के जीएसटी लागू झाल्यानंतर 10.50 रुपयांपर्यंत वाढायला पाहिजे होती. पण कंपन्या मनमानी कारभार करून किमती वाढवत आहेत. त्याचा फटका आधीच महागाईमुळे हैराण असलेल्या सामान्यांपर्यंतना बसणार आहे.. महत्त्वाच्या माहितीसाठी ReadMarathi.Com ला नियमितपणे भेट द्या..

Leave a Reply

Your email address will not be published.