हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियावर सायबर हल्ला, 45 लाख प्रवाशांचा वैयक्तिक डेटा चोरी..!

दिल्ली : सायबर हल्ल्यांमुळे संपुर्ण जग त्रस्त आहे. आता पर्यंत जगातल्या मोठ-मोठ्या कंपन्या या सायबर हल्ल्यांना बळी पडलेल्या आहे. आणि कंपन्यांना कोटी रुपयाचे नुकसान या सायबर हल्ल्यांमुळे सोसावे लागले आहे. कंपन्यांची सायबर सुरक्षा भक्कम असतांनाही अशा प्रकारचे हल्ले होणे अलीकडे साधारण बाब झाली आहे. अलीकडेच भारतातील हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया वर मोठा सायबर हल्ला झाल्याचे कंपनीने उघड केले आहे.

या सायबर हल्ल्या मध्ये 45 लाख प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी गेली आहे. या चोरी गेलेल्या डेटा मध्ये प्रवाशांचा मोबाईल नंबर, पासपोर्ट ची माहिती, प्रवाशांच्या नावांसह क्रेडिट कार्डची माहितीही चोरी गेल्याचे एअर इंडियाने सांगितले आहे. क्रेडिट कार्डची माहिती चोरी गेली असली तरी सीवीवी नंबर डेटा प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही अशी माहिती एअर इंडिया कंपनीने दिली आहे. तरी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने आपल्या प्रवाशांना सावधानी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रवाशांनी क्रेडिट कार्डचे पासवर्ड बदलावे असही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट, 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 या कालावधीतील डेटा चोरीला गेल्याचे कंपनीने उघड केले आहे. हा हल्ला कंपनीच्या SITA PSS या सर्व्हरवर झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सायबर हल्ल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि डेटा सुरक्षा विचारात घेऊन कंपनीचा FFP प्रोग्रामचा पासवर्ड बदलण्यासाठी प्रयन्त सुरू झाले आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा..

Leave a Comment