शेतकऱ्यांनो जीव महत्वाचा; विजांपासून वाचण्यासाठी हे ॲप करणार मदत, वाचा संपूर्ण माहिती..!

विजांचा कडकडाट होत असताना प्रत्येकाला भीती वाटत असते. कारण विज पडण्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. हे सर्वांना माहित असल्यामूळे पावसाळा सुरू झाला की बरेच जण विजांचा कडकडाट होत असताना विज पडू नये म्हणून घरातील वयोवृद्ध सांगतील त्याप्रमाणे उपाययोजना केल्या जातात. त्यातच याचा सर्वात जास्त धोका शेतात राबराब राबणाऱ्या बळीराजाला आणि मेंढपाळ करणार्‍यांना जास्तच असतो.

दरवर्षी अनेक जण या घटनेला बळी पडतात. विज पडून मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकर्‍यांची संख्या जास्तच असते. पावसाळ्यात शेतात राबत असताना शेतकर्‍याला नाहक आपला जीव गमवावा लागू नये यासाठी भारत सरकारने एक उपाययोजना आणली आहे. भारत सरकारने ‘दामिनी’ नावाचे ॲप लॉन्च केलं आहे. यामुळे विजेची पूर्वसुचना आता शेतकर्‍यांना मिळणार आहे.

येथे वाचा – पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : शेतकर्‍यांना दिला महत्वाचा सल्ला, पहा 25 जून पर्यंतचा अंदाज..!

सर्वसाधारणपणे जून व जुलै मध्ये विज पाडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामूळे कोणालाही आपले प्राण गमवावे लागू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने या ॲप ची निर्मीती केली आहे. हे ॲप प्ले स्टोर वर Damini : Lightning Alert या नावाने सहज उपलब्ध आहे.. हे ॲप जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी डाऊनलोड करून त्याचा वापर करावा अस आवाहन प्रशासनातील अधिकारी करीत आहे.

दामिनी ॲप कसे वापरावे? (How to use Damini App in Marathi)..

1) हे ॲप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. त्यामूळे भारत सरकारच्या साइट व्यतिरिक्त एखाद्या दुसर्‍या साइट वरून हे ॲप डाऊनलोड करू नका..

येथे वाचा  – सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!

2) Damini हे ॲप फक्त 3 mb या साइज मध्ये उपलब्ध आहे. हे  ॲप काही सेकंदातच Install होते. त्यामूळे छोट्या फोन मध्ये देखील हे काम करते.

3) ॲप इनस्टॉल झाल्यानंतर enable GPS अस विचारलं जातं. GPS ची परवानगी न दिल्यास हे ॲप वापरता येत नाही. त्यामूळे चौकोनी कप्प्यावर क्लिक करून ॲप च्या प्रायव्हसी पॉलिसीला सहमती दिल्या नंतर Enable GPS वर क्लिक करायचे आहे.

4) त्यानंतर Location ची परवानगी द्यावी लागते. Location ची परवानगी दिल्यानंतर ॲप सुरू होते.

5) ॲप च्या मुख्य पृष्ठावरच आपण राहत असलेल्या 20 ते 40 किलोमीटर आतील क्षेत्र दाखवले जाते. विज पडण्याची शक्यता नसेल तर याच मुख्य पृष्ठावर खाली No Lightning Warning / बिजली की चेतावणी नही अस दाखवले जाते. हे सर्व वातावरणानुसार दाखवले जाते.

6) मुख्य पृष्ठावरच उजव्या बाजूला खाली Register ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून register करून घ्यावे. त्यामध्ये तुम्हाला नाव, मोबाइल नंबर, पत्ता, पिन कोड आणि व्यवसाय विचारला जातो. त्यानंतर आपल्याला आपल्या क्षेत्रातील वीज पडण्याची पूर्व सुचना दिली जाते..

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसाठी ही माहिती WhatsApp वर शेअर करा

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…