“सोनू सूद सारखं काम कर” देवलीना भट्टाचार्जीचा कंगणा रानौतवर निशाना..!

मुंबई : कोविडमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. रुग्णांना उपचार घेण्यासाठी औषध व बेड्स उपलब्ध नसल्याने विरोध व सत्ताधारी एकमेकांवर चांगलेच टीका-टिप्पणी करत आहे. कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर विरोधक आणि नागरिक नाराज आहे. त्यामुळे नागरिक आणि विरोधक सरकारच्या कारभारावर आणि उद्भवलेल्या परिस्थितीवर संताप व्यक्त करण्यासाठी मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर करत आहे. अशा परिस्थितीत सरकारचा बचाव करण्यासाठी कंगणा रानौतने उडी घेतली आहे.

कंगणा रानौतने म्हटलं आहे की ‘पहिल्या लाठेत अमेरीका आणि इटलीमध्ये परिस्थिती खुप खराब झाली होती. इटली मधील परिस्थिती आपन सर्वांनी पाहिली होती. दुसऱ्या लाठेचा सामना इंग्लंडला करावा लागत आहे. मग तेथील नागरिकांनी एखाद्या नेत्याला व सकारला जबाबदार ठरवले नाही. असं म्हणत कंगणा रानौतने सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. मोदी सरकारला बदनाम करण्याचे काम चालू असल्याचा आरोप करत कंगणा रानौत सरकारच्या बाजूने ठाम उभी राहिली आहे.

देवलीना भट्टाचार्जीने कंगणा रानौतच्या वक्तव्यावर आपले मत नोंदवले आहे. ‘जर कंगणाला वाटत असेल की देशात ऑक्सिजन आणि बेड्ची कमी नाही. तर तीने समोर येऊन सोनू सूद सारखं काम व लोकांची मदत करायला पाहिजे. प्रत्यक्ष रुग्णालयांना भेट द्यायला पाहिजे. असं म्हणत देवलीना भट्टाचार्जीने कंगणाला लोकांची मदत करण्याचे आवाहन केले केले आहे.

Leave a Comment