बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; कारण ऐकून बसेल धक्का..!

देशामधील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे बर्‍याच काळापासून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. बजेटमध्ये घर (Budget Friendly Home) मिळत नसल्याने ते आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अनेक सामान्य कुटुंबाना नेहमी असं वाटत असतं की सरकारी योजना किंवा खाजगी विकासक एखाद्या परवडणाऱ्या घरांची योजना (Affordable housing scheme) सुरू करतील आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. पण या योजनांमध्ये देखील त्यांच्या बजेटमध्ये घर नसते. त्यातच घर घेणाऱ्यांसाठी पुन्हा एक वाईट बातमी आली आहे. अलीकडच्या काळात बांधकाम व्यावसायिक म्हणजेच बिल्डर 40 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांची ऑफर कमी करू लागले आहे. अशी माहिती मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकच्या अहवालातून मिळाली आहे.

स्वस्त घरे बांधण्याचे प्रमाण कमी (Cheap Flats)

मिळालेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात बिल्डर स्वस्त घरे बांधत नाहीत. काही बिल्डर बांधकाम करत असले तरी त्यांचा वाटा अत्यंत कमी आहे. त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

परवडणारी घरे फक्त 18 टक्क्यांवर (Affordable Flats)

मिळालेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये स्वस्त किंवा परवडणाऱ्या नवीन घरांच्या ऑफर फक्त 18 टक्क्यांवर आल्या आहे. जुलै-सप्टेंबर 2018 मध्ये एकूण नवीन घरांच्या लॉन्चिंगपैकी 42 टक्के वाटा परवडणाऱ्या घरांचा होता. पण आता जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांचा वाटा 18 टक्के झाला आहे. यातून असे दिसून येते की अलीकडच्या काळात बिल्डर स्वस्त आणि परवडणारी घरे कमी बांधत आहे.

अर्ध्या किंमतीत मिळणार म्हाडाचं सर्वात मोठं घर; डोंबिवलीत घर उपलब्ध, पहा बातमी..

अधिक नफा मिळविण्यासाठी बिल्डरचा आलिशान फ्लॅटवर भर (Luxurious flats)

Anarock च्या अहवालात दिल्ली-NCR, मुंबई महानगर प्रदेश, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू तसेच हैदराबाद आणि पुणे या सात शहरांचा डेटा समाविष्ट करण्यात आला आहे. सध्याच्या काळात बिल्डर्स अधिक नफा मिळविण्यासाठी आता आलिशान निवासी प्रकल्पांवर भर देत असल्याचे दिसत आहे. बिल्डरांना स्वस्त घरांमध्ये कमी नफा मिळतो. तसेच जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प (Affordable Housing Project) बांधकाम व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत. अॅनारॉकने (Anarock) दिलेल्या माहितीनुसार, एकूण नवीन पुरवठ्यामध्ये परवडणाऱ्या घरांचा वाटा घसरत असताना, 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी घरांचा (Luxurious flat) वाटा वेगाने वाढत आहे. मागील पाच वर्षांमध्ये त्यात तिप्पट वाढ झाली आहे. कोरोना संकटानंतर आता लोकांनी मोठ्या घरांची मागणी केली आहे.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Leave a Comment