कोविशील्डच्या दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवले, त्याचे फायदे जाणून घ्या..!

दिल्ली : देशात लसीकरण जोरात सुरू आहे. यामुळे काही राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकं यामुळे काय फरक पडणार? असे प्रश्न काही नागरिक उपस्थितीत करत आहे.

दुसऱ्या डोस मधील अंतर वाढमुळे होणारा फायदा
लसीच्या पहिल्या डोस नंतर जर दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यानंतर दिला तर त्याचा 6 ते 8 आठवड्याच्या अंतरात दिलेल्या डोस पेक्षा चांगला परिणाम जाणवतो असे मत ऑक्सफर्ड विद्यापीठाने मांडले आहे. त्यांच्या माहीतीनूसार जर दुसरा डोस 6 ते 8 आठवड्याच्या अंतरात दिला तर त्याची परिणामकारकता 54.9 टक्के असते. आणि तोच डोस जर 12 ते 16 आठवड्यानंतर दिला गेला तर त्याची परिणामकारकता 82.4 टक्क्यांवर पोहचते असे मत ऑक्सफर्ड विद्यापीठाने मांडले आहे.

हे सर्व तपासण्यासाठी एकुण 17 हजार लोकांवर चाचणी करण्यात आली आणि संशोधन केलेल्या माहीतीनूसार दुसऱ्या डोस मधील अंतर 12 ते 16 आठवडे केले तर त्याची परिणामकारकता जास्त वाढते. अशी माहीती ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिली आहे. यामुळे दुसऱ्या डोस मध्ये 12 ते 16 आठवडे वाढ केल्यास मृत्यूचा धोका कमी होतो. लसीची कार्यक्षमता वाढते आणि अँटीबॉडीज मध्ये दोन पटीने वाढ होते. अशी माहीती आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment