कोरोना काळात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ नाही तर रोग प्रतिकारक शक्ती होऊ शकते कमी..!

रोग प्रतिकारकशक्ती काय असते याची ओळख बाहुतांश जणांना कोरोना काळात झाली. डॉक्टर व शास्त्रज्ञांच्या मतानुसार कोरोना व्हायरस पासून जर आपला बचाव करायचा असेल तर रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजेत असं सांगितलं जातं. फक्त कोरोनाचं नाही तर कोणत्याही व्हायरस सोबत लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारकशक्ती असणे गरजेचे असते.

कोरोना महामारी आल्यापासून लोकांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती बद्दल जागृती निर्माण झाली. टी.वी चॅनेल, सोशल मीडिया या माध्यमातून जागृती करण्यात आली. कोरोना व्हायरसवर कार्यक्षम लस उपलब्ध नसल्याने लोकांनी आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यावर भर दिला. शासकीय कार्यालयात व रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले जेणेकरुन कोरोना पासून त्यांचा बचाव होईल. पण आपन रोजच्या आहारात काही असे पदार्थ खात असतो ज्यामुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती त्यामुळे कमी होते. खाली दिलेले पदार्थ आपल्या आहारातून जर कमी केले तर आपली ईम्युनिटी टिकून राहण्यास मदत होते.

काय खाऊ नये :

(1) तळलेले पदार्थ – अश्या प्रकारचे पदार्थ सेवन केल्यामुळे त्याचा आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर खुप वाईट परिणाम होतो. चिकन फ्राईज, फ्रेंच फ्राईज आणि नूडल्स अशा तळलेल्या पदार्थांपासून दुर रहावे. अशा प्रकारच्या उच्च चरबीयुक्त आहाराचा आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर त्याचा वाईट परिणाम होतो.

(2) सोडा – सोड्या मध्ये हाय कॅलरी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याचा परिणाम आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर जाणवतो त्यामुळे यापासून दुर रहायला पाहिजेत.

(3) फास्ट फूड – बर्गर, पिझ्झा, सॅडविच हे पदार्थ आपली रोग प्रतिकारकशक्ती कमी करत असतात कारण यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कॅलरी, सोडीयम असतात.

(4) अल्कोहोल – अल्कोहोल च्या अतिसेवनाने आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर वाईट परिणाम होतो. अल्कोहोलच्या अतिसेवनाने झोपेचे नियोजन खराब होते आणि त्यामुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती कमी होते.

(5) एनर्जी ड्रिंक्स, पेस्ट्री, कूकीज आणि कैंडी केक्स या सारखे पदार्थ आपली रोग प्रतिकारकशक्ती कमी करतात.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment