सोयाबीन : आवक वाढली म्हणून घाबरू नका, पहा काय आहे तज्ञांचा सल्ला..!

सोयाबीन बाजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे, बर्‍याच शेतकरी बांधवांकडे सोयाबीनचा मोठा साठा (Stock) आहे. तर काही शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत सोयाबीनचा एक दानाही विकलेला नाही. मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याचं दिसतय, त्यामूळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये अस्वस्थतेतचं वातावरण निर्माण झालं आहे. सोयाबीनचे बाजार भाव पडणार तर नाही ना? असा सवाल सोयाबीनचा साठा असलेल्या शेतकरी बांधवांच्या मनात येत आहे. या विषयी तज्ञांना काय वाटतय? हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवांना सोयाबीन कडून 10 हजार प्रती क्विंटलची अपेक्षा आहे, या हेतूने सोयाबीनची साठवणूक करण्यात आलेली आहे. पण मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामूळे सोयाबीन विकावं की अजून काही दिवस ठेवावं, ठेवलं तर भाव वाढतील का? आवक वाढतच गेल्याने भाव खचणार तर नाही ना? अशा अनेक प्रश्नाने शेतकरी होरपळून निघत आहे.

हे पण वाचा

आजचे सोयाबीन बाजार भाव

यावर काही तज्ञांनी आपली मते व्यक्त केली आहे. काही तज्ञांच्या मते सोयाबीनची बाजारात आवक वाढल्यामूळे खुप कमी प्रमाणात भावांमध्ये उतार येऊ शकतो, पण जागतिक स्तरावर सोयाबीन बाजार भाव वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामूळे हा उतार जास्त दिवस नसेल. काही तज्ञांच्या मते सोयाबीनची आवक वाढली असली तरी सोयाबीनचे दर स्थिर आहे, त्याचा फारसा परिणाम सोयाबीन दरांवर दिसत नाहीये, त्यामूळे शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तज्ञांनी केले आहे. 

Leave a Comment