शेतमाल कमी भावात विकू नका, ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मिळवा चांगला भाव..!

मित्रांनो, शेतकरी वर्ग हा आर्थिक स्थिती खराब असलेला वर्ग समजला जातो. शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न खूपच कमी असल्याने शेतकर्‍यांना नेहमीच आर्थिक संकटचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी याचा देखील त्यांच्या जीवनात भर पडते. त्यामूळे त्यांना आर्थिकरित्या सक्षम जीवन जगता येणे शक्य होत नाही. (Don’t sell farm produce at low prices, take advantage of this scheme and get good prices)…

अपुऱ्या शेत उत्पादनामुळे शेतकरी नेहमीच कर्जबाजारी झालेला असतो आणि त्याच्यावर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत राहतो. परिणामी वाढत्या व्याजाच्या भीतीने शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या भावात देऊन टाकतात. त्यामूळे त्यांना त्यांच्या शेतमालाचा हवा तो मोबदला मिळत नाही.

हे सर्व लक्षात घेऊन कृषी पणन महामंडळाने एक योजना चालू केलेली आहे. ‘या’ योजनेमूळे शेतकरी बांधवांना भाववाढ मिळण्यासाठी प्रतीक्षा करता येणार आहे. तोपर्यंत शेतकर्‍यांना आपला शेतमाल तारण ठेऊन शेतमालाच्या 75 टक्के कर्ज कमी व्याजदरात दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ‘या’ योजने बद्दल …

हे पण वाचा

E Shram Card : ‘या’ तारखेला बॅंक खात्यात मिळणार पैसे, जाणून घ्या ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्याचे फायदे..!

शेतमाला तारण योजना. (Shetmal Taran Yojana)

मित्रांनो, कृषी पणन महामंडळाने या योजनेची सुरुवात 1990 पासून केली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटामूळे किंवा साठवणूकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने शेतमाल मिळेल त्या भावात विकावा लागतो. त्यामूळे शेतकर्‍यांच मोठं आर्थिक नुकसान होतं व त्याच्याकडून शेतीला लावलेला खर्चही काढता येत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कृषी पणन महामंडळ ही योजना राबवत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी आपला शेतमाल बाजार समिती किंवा महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्या/ केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवतात. त्यावर बाजार समिती तेव्हाचा चालू भाव लावून मालाच्या एकूण 75 टक्के जवळपास कर्ज 6 टक्के व्याज दराने 6 महिन्याच्या कालावधीसाठी देतात. या योजनेचा लाभ फक्त शेतकर्‍यांनाच घेता येतो, व्यापारी वर्गाला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

नाव नोंदणी प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याला बाजार समितीला भेट द्यावी लागते. त्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करून फॉर्म नं.6 भरावा लागतो. त्यामध्ये ठेवी दाराचे नाव, शेतमाल माहिती व शेतकर्‍याची ओळख पत्रं (आधार कार्ड/पॅन कार्ड) द्यावं लागतं. त्यानंतर कर्ज मंजूर केले जाते. शेतकर्‍याचा ठेवलेला शेतमाल  सांभाळण्याची जबाबदारी बाजार समितीची असते.

‘या’ शेतमालाचा समावेश

या योजनेचा लाभ काही निवडक शेतमालालाच मिळतो. ते शेतमाल पुढीलप्रमाणे – सोयाबीन (Soybean), सुर्यफूल, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका, गहू, चना, भात, बेदाणा, बाजरी, करडई, राजमा, हळद व सुपारी. या पिकांवर शेतमाल तारण योजनेअंतर्गत हे कर्ज मिळवता येते…

शेतमालाचे ताजे बाजार भाव, कृषी योजना, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी स्क्रीन वर दिसत असलेल्या WhatsApp बटणावर क्लिक करून आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published.