शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; प्रचंड पावसात लष्करी अळीचा हल्ला, कीटक नाशकही झाले फेल, सोयाबीची वाढ थांबली..!

शेअर करा

यंदा पेरण्या होताच पावसाने राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. खरिपासाठी आणि पेरण्या होताच पावसाची अत्यंत आवश्यकता असते पण यावर्षी ताज्या पेरण्या झालेल्या असताना आणि काही भागात पिके छोटे-छोटे असतानाच पाऊस सारखा लागून असल्यामूळे हा पाऊस पिकांना नुकसान कारक ठरत आहे. आता अलीकडेच सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला वाढत आहे. पाऊस सारखा चालू असल्यामूळे हे वातावरण लष्करी अळीसाठी फायद्याचे ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामूळे लष्करी अळीचा जोर वाढत आहे. (Double crisis on farmers; Military larvae attack in heavy rains, pesticides failed, soybean growth stopped ..!)..

आता सध्या शेतकर्‍याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाऊस सारखा सुरू असलेल्या वातावरणात पिकांवर कीटक नाशके फवारूनही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लष्करी अळीचा हल्ला कायम आहे. बुलढाणा जिल्ह्यात पाच वर्षांपुर्वी या अळींमूळे प्रचंड नुकसान झाले होते. आता परत एकदा जिल्ह्यातील शेतकरी या अळींमूळे त्रस्त झाले आहेत.

येथे वाचा – बाप रे! सोयाबीन वर हा रोग असेल तर त्वरीत करा उपाय, नाहीतर उत्पादनात येईल मोठी घट..!

सोयाबीनची वाढ थांबली

पूर्ण जून महिना तसाच कोरडा गेला त्यामूळे पेरण्या लांबल्या होत्या पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. पेरणीसाठी मध्यंतरी काही दिवस वेळ मिळाल्याने पेरण्या उरकल्या पण गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सारख्या पावसाने पिके पिवळी पडायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकाची वाढ थांबल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून ऐकायला येत आहे.

शेतकर्‍याच्या पिकावर लष्करी आणि उंट अळीचा हल्ला

गेल्या 8 दिवसांपासून सूर्य दर्शन झालेले नाही. सारखे ढगाळ वातावरण असल्यामूळे पिकांची वाढ तर थांबलीच पण त्यातल्या त्यात पिकांवर लष्करी अळी आणि उंट अळींनी जोरदार हल्ला सुरू केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात याचा परिणाम जाणवत आहे. यामध्ये शेगाव, खामगाव आणि संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश आहे.

यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांनी फवारणी केली पण या सारख्या सुरू असलेल्या पावसामुळे फवारणीचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही. या कारणामुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे. अशा परिस्थितीत पेरणी संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या कृषी अधिकार्‍यांनी आता या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा