आता हे ऐका “रोज गोमूत्र पिल्याने कोरोना होणार नाही”; भाजप आमदाराचे गजब विधान..!

दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा विस्पोट झालेला आहे. देशातील बहुतांश राज्ये कोरोनाच्या महामारीने झपाटले आहे. रुग्णवाढीमुळे रुग्णांना औषधोपचार मिळत नसल्यामुळे मृत्युचा आकडा वाढला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारे आपआपल्या परीने उपाय योजना करत आहे. पण कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. रुग्णसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशी परिस्थिती असताना भाजपाच्या एका आमदाराने कोरोना बरा करण्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. “रोज गोमुत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही” असं भाजप आमदाराचे म्हणणे आहे.

गोमुत्र पिल्याने कैंसर व कोरोना सारखे आजार बरे होतात असं वादग्रस्त विधान बुलंदशहचे भाजपाचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोमुत्र प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज 25 एमएल गोमुत्र घेतल्यास सर्व आजार निघून जातात असं आमदार देवेंद्र सिंह लोधी यांचा दावा आहे. आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी या अगोदर देखील अशा प्रकारचे विधाने केलेले आहे.
गाईचे गोमुत्र किडनी आणि लिव्हर यांना देखील खराब होऊ देत नाही असं देखील देवेंद्र सिंह लोधी यांनी म्हटलं आहे. गोमुत्र उपाशी पोटी पिल्याने कोरोनाचा खात्मा होईल असा दावा उत्तराखंडचे भाजप आमदार महेंद्र भट्ट यांनी देखील केला आहे.

अशा दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात टिकाटीप्पनीले सुरवात झाली आहे. राजकीय नेते राजीव शुक्ला यांनी असं विधान करणाऱ्यांवर कडक टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, ‘हे अजून पण चालूच आहे, यांना कोणीतरी समजून सांगा की अशा बोलण्याने लोकांमध्ये संताप निर्माण होतो. भाजपाच्या आमदारांना बोलण्याची सवय झालेली आहे. कोणीही गोमूत्राच्या विरोधात नाही. पण डॉक्टर असल्याप्रमाने कोरोना वरील इलाज सांगून गो मातेला यामध्ये आणू नये. असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment