दुबई जवळ ऐवढा पैसा कसा आला? जाणून घ्या सत्य..!

मुंबई :  आज पासून वीस वर्षांपूर्वीचा जर विचार केला तर दुबईची परिस्थिती कशी होती? या प्रश्नाचे उत्तर ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल. दुबईमध्ये वीस वर्षांपूर्वी फक्त वाळवंट होता. ना तिथे पाणी उपलब्ध होते, ना उपयोगात येणारी जमीन, मग दुबईची ऐवढी प्रगती झाली कशी? दुबईने जगात सर्वात मोठे किंवा एकमेव निर्माण करण्याचे विक्रम नोंदवले कशे? (Dubai information in Marathi)

दुबई जवळ ऐवढा पैसा कसा आला?(How did Dubai get so much money?)

दुबई हे एक शहर आहे. ते संयुक्त अरब अमीरात(UAE) या देशामध्ये स्थित आहे. 2006 पासून शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौम हे संयुक्त अरब अमीरात(UAE) या राष्ट्राचे पंतप्रधान आहे. दुबईचा झपाट्याने झालेला विकास याच माणसामुळे शक्य झाला.

शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौम यांचा जन्म 15 जुलै 1949 रोजी संयुक्त अरब अमीरात(UAE) झाला. असं म्हटलं जातं की शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौम अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवतात. मागील वीस वर्षांमध्ये दुबईचे वाळवंटातून एक थ्रिडी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या गार्डन सारखे शहर करून दाखवले हे त्याचे उत्तम ऊदाहरण आहे.

आज दुबई कडे खुप पैसा आहे. मग तो कसा आला? दुबईकडे स्वतः चे अन्नधान्य नाही, स्वतः चे पाणी नाही, सोने नाही मग हे कसे शक्य झाले? ते शक्य झाले दूरदृष्टी ठेवणाऱ्या एका लिडरमुळे. शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौम यांच्यामुळे. दुबईची प्रगती शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौमच्या दूरदृष्टी मुळे झाली.

दुबईमध्ये त्यांनी जगात सर्वात मोठे किंवा एकमेव अशा वास्तूंची निर्मीती करण्यावर जास्त भर दिला आणि दुबईला बनवले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे ट्रॅवल सिटी. जगातील सर्वात मोठी इमारात बुर्ज खालिफा (उंची 828 m / 2722 फुट), जगातील सर्वात मोठा मॉल “दी दुबई मॉल”, पाण्यावर तरंगणारी लोकवस्ती “पाल्म जुमेरा”, जगातील सर्वात मोठी फाईव स्टार हॉटेल “जे डब्लु मॅरिअट आणि तेथे सोने उपलब्ध नसताना जगातील सर्वात मोठे “दी गोल्ड सौक” नावाचे सोन्याचे मार्केट उभे केले. यामुळे तेथे पर्यटन व्यवसाय खुप मोठा झाला. यातून खुप मोठा पैसा तेथील शासनाला मिळाला आणि तोच पैसा त्यांनी मोठ-मोठ्या प्रोजेक्टवर गुंतवला आणि दुबई मालामाल झाली.

टॅक्स फ्री अर्थव्यवस्था (Tax free economy in Dubai in Marathi)


दुबईमध्ये उद्योगांकडून टॅक्स घेतला जात नाही. टॅक्स फ्री अर्थव्यवस्था असल्यामुळे नवनवीन उद्योगांना चालना मिळते. त्यामुळे बेरोजागरीचे प्रमाण तिथे खुप कमी झालेले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत पोलीस आणि ऑनलाइन दंड प्रणाली (The richest policeman in the world in Marathi)


दुबईमध्ये स्मार्ट पोलीस स्टेशन आहे. तेथे प्रत्यक्ष पोलीस कर्मचारी नसून मशिनरीच्या मदतीने ऑटोमॅटीक पध्दतीने काम काज चालते. पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर तिथे विशेष कामांसाठीच केला जातो. त्यांच्याकडे महागड्या गाड्या शासनाने दिलेल्या आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत पोलीस आहे. तिथे कोणत्याही गुन्ह्यासाठी ऑनलाइन दंड आकारला जातो. रस्त्यावर धावणारी गाडी जर अस्वच्छ असेल तर कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय ऑटोमॅटीक ऑनलाइन पध्दतीने दंड आकारला जातो. कोणत्याही गुन्ह्यासाठी अशाच प्रकारे दंड आकारल्या जात असल्यामुळे तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. आणि ऑटोमॅटीक ऑनलाइन पध्दतीच्या दंड आकारणीमुळे शासनाची तिजोरी देखील भरली जाते आणि यामुळे तिथे भ्रष्टाचाराला पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहे. (Dubai information in Marathi)

शैख मोहम्मद बिन राशिद अल मॅकतौम यांचे ध्येय (The goal of Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum in Marathi)


दुबईमध्ये 2030 पर्यंत 25 टक्के इमारती थ्रिडी प्रिंटिंग ने बनवायचे त्यांचे ध्येय आहे. जास्तित जास्त 100 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या ड्रोनची निर्मीती चालू आहे. 2025 मध्ये दुबई मधील 25 टक्के गाड्या विना ड्राईवरच्या असतील. हे देखील त्यांचे गोल आहे. 

हे पण वाचा

बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर

बघा पाऊस सुरु असताना कसा दिसतोय जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment