जिगरबाज शेतकरी ! कांद्याने कर्ज बाजारी केले, शेतकर्‍याने गावात दवंडी देऊन नांदच केला..!

या शेतकर्‍यांने जे केलं ते ऐकून सगळीकडेच चर्चा सुरू आहे. कारण या शेतकर्‍यांने गावात दवंडी दिली आणि सर्वत्र याची चर्चा सुरू झाली..(Farmer became indebted due to onion, see what did farmer..!)

Read Marathi Online : नांद करा पण शेतकर्‍यांचा कधीच करू नका असं बर्‍याच वेळा आपल्या कानी पडतं किंवा असं बर्‍याच वेळा म्हटलं जातं. आपण बघतो शेतकरी दरवर्षी आपल्या जीवाचे रान करून मोठ्या कष्टाने शेतीत अन्न धान्य पिकवत असतो. हे सर्व करत असताना शेतकर्‍याला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. तरी पण तो मेहनत घेण्यासाठी नेहमीच उभा असतो.

एवढ करूनही त्याच्या कष्टाने मिळालेल्या फळाला अखेर शेवटी कवडीमोल दर दिला जातो. असच एका शेतकर्‍या सोबत घडलं आहे पण या शेतकर्‍यांने खचून न जाता आपला दिलदार आणि जिगरबाजपणाचा परिचय इतराना करून दिला आहे. या शेतकर्‍यांने जे केलं ते ऐकून सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरातील एका शेतकर्‍याने उत्पादन चांगले निघेल या हिशोबाने रब्बीच्या काळात आपल्या शेतात कांदा पिक मोठ्या मेहनतीने वाढवले. मात्र हेच कांदा पिक काढणीला आल्यानंतर दर मोठ्या प्रमाणात घसरले..

शेतकर्‍यांना आपला मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा 200 रुपये प्रति क्विंटल दराने म्हणजेच कवडीमोल दराने विकावा लागला. त्यामूळे शेतकर्‍यांना आपल्या उभ्या कांदा पिकात ट्रॅक्टर व कुळव चालवावी लागली.

येथे वाचा  – अजित पवारांची मोठी घोषणा; 1 जुलै रोजी ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार रुपये..!

तामलवाडी परिसरातील राम गुंड या शेतकर्‍यांने देखील आपल्या दोन एकर कांदा पिकात कुळव चालवत शेतात शिल्लक असलेला कांदा गावातील लोकांना फुकट वाटून देण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शेतकर्‍यांने कांदा फुकट वाटण्यासंदर्भात गावात दवंडी दिल्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

तामलवाडी भागातील पिकांचा जर विचार केला तर येथील शेतकरी मुख्यतः कांदा पिकावर अवलंबून असतात. त्यापैकीच एक राम गुंड आहेत की जे आपल्या शेतात कांदा पिकाची लागवड करतात. यावर्षी त्यांना कांदा पिकाला 70 हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे. पण कवडीमोल दराने हा खर्च वसूल होऊ न शकल्याने त्यांनी कांदा फुकट वाटण्याचा निर्णय घेतला. आणि गावातील व आजुबाजुच्या परिसरातील लोकांना त्यांच्या जिगरबाजपणाचा आणि शेतकर्‍यांची झालेल्या दयनीय अवस्थेचा त्यांनी परिचय करून दिला आहे.

शेतमालाचे बाजार भाव आणि शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..