बाप रे ! शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

Read Marathi Online : अलिकडे उच्च शिक्षण घेतलेले तरूण शेतीकडे वळताना आपण पाहत आहोत. आणि खरोखरच उच्च शिक्षण घेतलेले तरूण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या बळावर शेतीमध्ये विक्रमी उत्पादन देखील घेत आहेत. आज आपण ज्या उच्च शिक्षित तरुणाबद्दल बोलणार आहोत, त्या तरूणाने व त्यांच्या पत्नीने सरकारी नौकरीच्या मागे न पळता शेती करण्याचे ठरवले आणि शेती मध्ये जबरदस्त उत्पादन घेऊन दाखवले आहे. ‘या’ तरूण शेतकर्‍याने आपल्या अडीच एकरात तब्बल 18 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.(Farmer earns Rs 18 lakh in 2.5 acres; cultivated this crop)..

मागील काही वर्षांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. पाऊस हाताशी आलेले पीक मातीमोल करत आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सिल्लोड, कन्नड, भोकरदन व विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीची शेती होत असते. सततच्या होणाऱ्या अवकाळी पावसाने या भागातील मिरची खराब होत असते. पण पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकरी ऐन पावसाळा संपल्यावर मिरचीची शेती करत असतात. साधारणपणे या भागात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मिरची पिकवली जाते. नेमका याच गोष्टीचा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला आहे.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

उर्वरित महाराष्ट्रातील मिरची अतिवृष्टीने खराब झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या मिरचीला चांगला दर मिळाला आहे. याच भागातील एका शेतकऱ्याने अडीच एकरात तब्बल 18 लाखांची मिरची पिकवली आहे. एवढे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे शरद पाटील…

हे पण वाचा – 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

पाटील हे तानसा नदीच्या तीरावरील चिंचवली या गावचे रहिवाशी आहे. शरद पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघेही उच्च शिक्षित आहे. नौकरी करण्यापेक्षा पाटील व त्यांच्या पत्नीने शेती करण्याला प्राधान्य दिले. पाटील यांच्याकडे पाण्याची मुबलक व्यवस्था असल्याने त्यांनी 27 ऑक्टोबरला मिरचीची लागवड केली आणि त्यानंतर मिरचीची व्यवस्थित काळजी घेतली.

कोणत्या जातीच्या मिरचीची लागवड केली?

पाटील यांनी एकाच प्रकारच्या मिरची वर अवलंबून न राहता आपल्या शेतात ज्वाला, आचारी, ईगल, 930 व ज्वेलरी या मिरचीची लागवड केली.

अडीच एकरात मिळाले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न

लागवडी पासून 85 ते 90 दिवसानंतर त्यांनी मिरची तोडणीला सुरुवात केली. त्यानंतर 300 क्विंटल एवढे विक्रमी उत्पन्न त्यांच्या हाती आले आहे. दर 80 ते 100 दरम्यान मिळाल्याने आतापर्यंत अंदाजे 18 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. पिकाची योग्य ती काळजी घेऊन आणि योग्य औषदांचा, खतांचा वापर करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहे. योग्य ती मेहनत केल्याने शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवता येते हे या तरूण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे..

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.