लय भारी! शेतकरीच बनला व्यापारी; पहा कांद्याला कसा मिळवला चांगला दर..!

शेअर करा

कांद्याला मिळणार्‍या कवडीमोल भावामूळे त्रस्त असलेल्या मनमाड येथील काही शेतकर्‍यांनी एकत्र येत एकजुटीची ताकद काय असते हे दाखवलं आहे आणि आपल्या कांद्याला चांगला दर मिळवला आहे. शेतकर्‍यांनीच मिळून कांद्याचा वांदा मिटवला आहे. या शेतकर्‍यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (Farmers became traders, See how onions got better rates

Read Marathi Online : शेतकर्‍यांना खूप काही सहन करावं लागतं. शेती मशागतीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते, सावकारांच्या दारी चकरा माराव्या लागतात. त्याकाळात त्याला लागणारं सर्वच साहित्य महाग मिळतं. विशेष म्हणजे शेतकरी शारीरिक कष्ट खूपच घेत असतो आणि एवढ करूनही उत्पादन हाती आल्यानंतर त्याला मिळतो तो कवडीमोल दर आणि हेच चक्र त्याच्या आयुष्यात वर्षानुवर्ष फिरत राहतं.

या सर्व परिस्थितीला व्यापारी आणि सरकारचे धोरणे जबाबदार आहे. त्यामूळे यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनीच आपला शेतमाल थेट ग्राहकाला विकला पाहिजे, मार्केट ताब्यात ठेवलं पाहिजे असं बोललं जातं. असच काही करून दाखवलं आहे मनमाड मधील काही शेतकर्‍यांनी. कांद्याला मिळणार्‍या कवडीमोल भावामूळे त्रस्त असलेल्या येथील काही शेतकर्‍यांनी एकत्र येत एकजुटीची ताकद काय असते हे दाखवलं आहे आणि आपल्या कांद्याला चांगला दर मिळवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. काही ठिकाणी तर शेतकर्‍यांना 50 ते 75 रुपये क्विंटल कांदा विकावा लागला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये राहणार्‍या एका शेतकर्‍यांने तब्बल 200 क्विंटल कांदा मोफत वाटून दिला आहे. यावरून कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे किती वाईट हाल असतील याचा अंदाज येतो.

येथे वाचा  – आजचे कांदा बाजार भाव

काही शेतकर्‍यांना मार्केट दूर असल्यामूळे माल बाजारात वाहतुकीचा खर्च करून आणायला परवडत नाही. बाजारात आणल्यानंतर व्यापारी कवडीमोल दराने मागतात. तसेच व्यापारी वर्गाद्वारे शेतकर्‍यांची बर्‍याचदा मस्करी केली जाते. या परिस्थीतीला कंटाळलेल्या मनमाड येथील काही कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी एकत्र येत आपला कांदा स्थानिक व्यापाऱ्यांना न देता थेट व्हिएतनामला निर्यात केला आहे. मनमाड येथील नदीम शेख आणि फजल कच्छी यांनी शेतकर्‍यांना एकत्र करत कांदा मुंबई येथील पोर्ट वरून व्हिएतनामला आणि अजून इतर देशांमध्ये पाठविला. राज्यातील बाजार पेठेत कवडीमोल विकला जाणारा कांदा परदेशात 20 रुपये किलोने विकला गेला. यामुळे शेतकर्‍यांना चांगला दर मिळाला आहे.

येथे वाचा  – शेतकर्‍यांनो ! सतर्क रहा; उद्या ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा..!

शेतकर्‍यांनी जर मनावर घेतलं तर ते काहीही करू शकतात याचच हे एक उत्तम उदाहरण आहे. शेतकर्‍यांनी मिळून आपला कांदा परदेशात निर्यात केल्यामुळे या शेतकर्‍यांचे कौतुक केले जात आहे. शेतकर्‍यांच्या एकजुटीचा फायदा शेतकर्‍यांना नेहमी होत असतो. या वर्षी सोयाबीन बाबतीतही शेतकर्‍यांना याचा चांगलाच अनुभव आला. शेतकर्‍यांनी एकजुट दाखवत आपला शेतमाल टप्प्याटप्प्याने विकला आणि सोयाबीनला चांगला दर मिळाला.

येथे वाचा  – शेतकरी बांधवांनो सावधान ! बियाणे खरेदी करताना ‘ही’ चूक केल्यास कृषी विभागही तुमची मदत करू शकत नाही..!

बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published.