शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार खुप कमी किमतीत, ही आहे शेवटची तारीख..!

पीएम किसान ट्रॅक्टर योजना. Pradhan Mantri Kisan Tractor Yojana in Marathi

पीएम किसान ट्रॅक्टर योजना (PMKTY) या योजने अंतर्गत आता सामान्य शेतकरी देखील ट्रॅक्टर घेऊ शकणार आहे. आपन बघतो आहे की ट्रॅक्टर हे शेतीसाठी किती महत्वाचे साधन बनले आहे. Farmers will get tractors at very low prices, this is the last date

आजच्या काळात ट्रॅक्टर शिवाय शेती करणे खुपच अवघड झाले आहे. बहूतांश शेतीसाठी लागणारे उपकरणे ट्रॅक्टरद्वारेच चालवले जातात. जसे की नांगर, पेरणी यंत्र, पिक काढणी यंत्र आणि अजून बऱ्याच शेती कामासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतो. त्यामुळे ट्रॅक्टर सर्वांना घ्यावेसे वाटते, पण ट्रॅक्टर घेण्यासाठी लागणारा पैसा सर्व सामान्यांना देता येणे शक्य नाही. त्यासाठी सरकार ट्रॅक्टर घेण्यासाठी 20 ते 50 टक्के सब्सिडी देत आहे.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

इथे पहा

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा ऊद्देश. Farmers will get tractors at very low prices, this is the last date

आपल्या देशातील बहुसंख्य लोक शेतीवर उपजिवीका करत असतात. देशाला कृषी प्रधान म्हणून संबोधलं जातं. आणि देशातील बहुसंख्य शेतकरी दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. असे शेतकरी आपली आर्थिक प्रगती करण्यास असक्षम असतात. म्हणून सरकार शेतकरी बांधवांच्या हितासाठी नवनवीन योजना आणत असतं.

प्रतेक शेतकऱ्याला शेती कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध व्हावं या उद्देशाने सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना चालू केलेली आहे. काही राज्यांच्या राज्य सरकारांनी पण शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साधनं अल्प दरात विविध योजने अंतर्गत उपलब्ध करून दिले आहे.

अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख. (Last date to apply )

या योजनेसाठी अर्ज करण्याची नेमकी शेवटची तारीख काय आहे? हे अजून पर्यंत सरकारी वेबसाइट वर बघायला मिळालेलं नाही. पण एका मीडिया रिपोर्ट नुसार आणि एका हिंदी कृषी वेबसाइट नुसार शेवटची तारीख 15 डिसेंबर असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करायला हवं.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता. Eligibility for PM Kisan Tractor Scheme

केंद्र आणि काही राज्य सरकारे शेतकऱ्यांना कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी सब्सिडी देत असतात.
मित्रांनो, खाली दिलेल्या अटींची जर तुम्ही पुर्तता केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी तुमच्याकडे या पात्रता असायला हव्यात.

  • ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्याच्या नावावर मागील 7 वर्षात ट्रॅक्टर खरेदी व विक्रीचा व्यवहार असायला नको..
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असायला हवी.
  • ज्या शेतकऱ्याने अगोदर एखाद्या ट्रॅक्टर वर अनुदान मिळवलं असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही…
  • एका कुटंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • ही योजना फक्त छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. मोठे व धनवान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

असे करा अप्लाई

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोनही पध्दतीने अर्ज करू शकतात.
1. तुमच्या जवळपास असलेलेल्या CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे..
2. ही केंद्र सरकारची योजना असल्यामूळे तुम्ही देशातून कोठूनही अर्ज करू शकता.
3. या योजनेसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतील. त्यासाठी तुम्हाला ओळख पत्र म्हणून आधार कार्ड , मतदान कार्ड, ड्राइविंग लायसेन्स किंवा पॅन कार्ड यापैकी एक ओळख पत्र लागेल आणि सोबतच तुमचा बैंक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि मोबाइल नंबर गरजेचं आहे.

महत्वाची सुचना : ही माहिती इंटरनेट वर मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी CSC केंद्राला भेट देऊन चौकशी करावी… धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.