अखेर म्हाडाच्या या लॉटरीतून घर मिळणार; जानेवारीत मिळणार म्हाडाचे घर?

Mhada Lottery 2024 : लोकांच्या राहणीमानात मोठा बदल झाल्याने अलिशान घरांचा (Luxury Home) ट्रेंड सध्या सुरू आहे. अलीकडच्या काळात जिकडे पहा तिकडे घरांचे व इमारतींचे बांधकाम होताना दिसते. लोकांची घरांची मागणी लक्षात घेऊन बिल्डरांकडून मुंबईत व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरे (2 BHK flats Mumbai) बांधली जात आहे. यात सामान्य माणसांसाठी असलेल्या घरांपासून ते अलिशान घरांचा समावेश आहे. पण मुंबईत घरांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्याने अजूनही अनेकांकडे हक्काचे घर नाहीत. त्यामूळे या सामान्यांना घरे मिळावीत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून लॉटरी काढून सामान्यांना परवडणाऱ्या दरात घर देण्यात येत आहे. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार आता 5 हजारांपेक्षा जास्त इच्छुकांना आपले हक्काचे म्हाडाचे घर (Mhada Flats) मिळणार आहे. 

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

मुंबई आणि कोकण भागात कमी दरामध्ये समाधानकारक असलेले गृहसंकुले उभी करणार्‍या म्हाडाकडून पुढील काळात अजून एक सोडत काढली जाणार असून यात तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त इच्छुकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

अखेर म्हाडाच्या सोडतीला मुहूर्त मिळाला? (Mhada Lottery 2024)

म्हाडा कोकण मंडळाच्या 5 हजार 311 एवढ्या घरांची सोडत मागील काही दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत असून 24 हजारांपेक्षा जास्त अर्जदारांचे सोडत कधी होते याकडे लक्ष आहे. काही ना काही कारणांमुळे या सोडतीला आतापर्यंत ढकलण्यात आलं. पण आता मात्र या सोडतीसाठीचा मुहूर्त मिळाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ही सोडत आता 26 जानेवारीनंतर पार पडणार अशी दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्याच्या काळात मुख्यमंत्री हे दावोस दौऱ्यावरती आहे. त्यानंतर राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सोडत 26 जानेवारीनंतर केव्हाही पार पडू शकते, असा अंदाज आहे.

घराची किंमत कितीही असो, घर तर घेणारच… मुंबई शहरात घर खरेदी जोरात, मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर..!

म्हाडाच्या या सोडतीसाठी जवळपास 24 हजार एवढ्या अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अर्जासोबत अनामत रक्कम भरलेली असल्याने यात अर्जदारांचे पैसे अडकून पडले आहेत. अनेक अर्जदारांनी एकापेक्षा जास्त अर्ज आणि त्याकरिता अनामत रक्कम भरलेली असल्याने म्हाडाद्वारे ही सोडत लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी अशी

Leave a Comment