आता मुंबईकरांना लागणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी, पहा कुठे उपलब्ध होणार घरे..!

2 bhk flat Mumbai : मुंबईत घर घ्यायचे असेल तर म्हाडा (Mhada) हे नाव मुंबईकरांच्या डोळ्यासमोर येते. कारण मुंबईत म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात घरे (Mhada Flats Mumbai) उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामूळे मुंबईकरांना स्वस्तात घर घेण्याची संधी मिळत आहे. या नवीन वर्षात अनेक मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सामान्यांसाठी तब्बल 5 हजार घरे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना स्वस्तात घर घेण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाची ही घरे कुठे असणार आणि किती फुटाची असणार? याची माहिती याठिकाणी पाहूया..

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

याठिकाणी उपलब्ध होणार म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai)

अलीकडे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या म्हाडाकडून आदर्शनगर (वरळी), अभ्युदयनगर (काळा चौकी) आणि वांद्रे रेक्लमेशन याठिकाणी असलेल्या वसाहतींचा पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्यामार्फत करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाला जण सामान्यांकरिता 5 हजार घरे मिळणार आहे. ही घरे 300 चौरस फुटाची असणार आहेत. आता लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

म्हाडाकडून राज्य सरकारकडे काही वसाहतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. यात वांद्रे रेक्लमेशन, अभ्युदयनगर आणि आदर्शनगर या वसाहतींचा समावेश आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असल्याची माहिती मिळाली आहे. वांद्रे रेक्लमेशन, अभ्युदयनगर आणि आदर्शनगर यांच्या पुनर्विकासातून म्हाडाला जवळपास 5 हजार घरे उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या विक्रीमधून म्हाडाला तब्बल 9 हजार कोटी एवढा महसूल मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

1 thought on “आता मुंबईकरांना लागणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी, पहा कुठे उपलब्ध होणार घरे..!”

Leave a Comment