Mumbai 2 Bhk Flat : मुंबई सारख्या स्वप्न नगरीमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. आजच्या महागाईच्या युगामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करणे किंवा जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करणे याचा खर्च खूपच अवाढव्य आहे. यामुळे प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. असे असूनही घर खरेदी करण्याच्या स्वप्नावर तुम्ही ठाम असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या अगदी बजेटमध्ये मुंबई परिसरात स्वतःचे हक्काचे घर घेऊ शकतात (mumbai mhada lottery). दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा हजारो परवडणाऱ्या सदीनिकांच्या विक्रीची लॉटरी प्रक्रिया जाहीर केली आहे.
9 ते 49 लाख रुपयांच्या दरम्यान मुंबईत मिळतील म्हाडाची घरे;
तसेच म्हाडा ने प्रसिद्ध केलेल्या यादीप्रमाणे ज्या परवडणाऱ्या घरांसाठी ही जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे. ती सर्व घरे मुंबई परिसरामध्ये आहेत. त्यामध्ये विरार, वसई, ठाणे, टिटवाळा, मुंब्रा, कल्याण अशा विविध ठिकाणी ही घरे आहेत. या घरांच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर विविध श्रेणी नुसार घरांच्या किमती ठरवण्यात आलेले आहेत. यामध्ये 9 लाख रुपयांपासून 49 लाख रुपयांपर्यंत घराच्या किमती निश्चित केल्या आहेत. म्हाडा ने दिलेल्या माहितीनुसार लॉटरीच्या माध्यमातून मुंबई जवळ जी घरे विकली जाणार आहेत त्यापैकी सर्वात स्वस्त घर वसई मध्ये आहे आणि त्याची किंमत नऊ लाख रुपये इतकी आहे. तसेच विरार मध्ये 49 लाख रुपयांना सर्वात महाग घर विकले जात आहे.
खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे..ही चांगली संधी गमावू नका..
म्हाडा अंतर्गत कोकण मंडळांनी पालघर, ठाणे, रायगड, तसेच मुंबई जवळ असलेल्या विविध ठिकाणी लॉटरीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची विक्री केली जाईल. असे जाहीर केले आहे. त्यामधील एकूण 1000 पेक्षा ही अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विकली जातील. हाती आलेल्या माहितीनुसार या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 नोव्हेंबर आहे (Biggest Mhada Flat in Dombivali). तसेच 17 नोव्हेंबर पर्यंत याचे संपूर्ण पेमेंट स्वीकारले जाईल. तसेच लॉटरी चा निकाल 13 डिसेंबर 2023 रोजी म्हाडाच्या माध्यमातून जाहीर केला जाईल.
मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!
त्वरित ऑनलाईन अर्ज करा;
क्षेत्रफळाबद्दल आपण जर बोलायचे झाले तर सर्वात लहान अपार्टमेंट 258 स्केअर फुटाचे असणार आहे. तसेच सर्वात मोठ्या आपारमेंट बद्दल सांगायचे झाले तर 667 स्क्वेअर फुट इतके असेल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही https://housing.mhada.gov.in/ या लिंक वरती जाऊन अर्ज करा.
बाप रे! घर खरेदी केल्यानंतर फक्त रजिस्टर झालं म्हणून निवांत राहू नका; इथे पण करा नोंद..अन्यथा होईल फसवणूक..
मुंबई लॉटरी नंतर आता एका महिन्यानंतरच म्हाडाने ही नवीन योजना आपल्यापुढे जाहीर केली आहे. पुणे मंडळाच्या माध्यमातून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी 5,863 इतकी घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जातील असे जाहीर केले आहे. या घरांपैकी 2,445 घरे हे सर्वात प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्त्वावर दिले जाणार आहेत. म्हणजेच विक्री केली याची देखील माहिती तुम्ही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घेऊ शकता.