अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; स्वस्तात होईल घराचे स्वप्न पूर्ण..!

Affordable Flats : मोठ मोठ्या शहरात घरांच्या किंमती वाढल्या असल्या तरी काही ठिकाणी स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे (Affordable Flats) मिळतात. मुंबईमध्ये तर वन बीएचके घरही (1 bhk flat Mumbai) सामान्य माणसांसाठी खरेदी करणे अवघड झाले आहे. तशीच परिस्थिती राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील आहे. पण आज देखील काही ठिकाणी वन बीएचके फ्लॅटचे दर (1 bhk flat) परवडणाऱ्या दरात आहे. या बातमीत आपण सदर ठिकाणचे 2 बीएचके, 3 बीएचके फ्लॅटचे दर सुद्धा पाहिले आहेत.

मागील काही वर्षात वाघोली परिसरामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी मोठ-मोठे प्रकल्प उभे केले आहेत. आयटी पार्क मुळे या परिसरात अनेक कंपन्या आल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. तसेच तिथून अगदी 5 किलोमीटर अंतरावर लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर दहा किलोमीटर अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे. यामुळेच प्रवासाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना फायद्याचा ठरणारा वाघोली परिसर परवडणाऱ्या घरांमूळे (Affordable Flats Wagholi) निवासी झोन बनत आहे. मागील 15 ते 20 वर्षातच हे बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली हे ठिकाण सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

तेथील सध्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाखांच्या आसपास आहे. वाघोली ची विशेषतः म्हणजे पुरातन कालीन वाघेश्वर मंदिर हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. श्रावण महिना असो किंवा इतर कोणताही सणवार असो, येथे भाविकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. वाघोली मधील केसनंद रस्ता, बकोरी रस्ता, आव्हाळवाडी रस्ता तसेच भावडी रस्ता या चार भागांमध्ये मागील दहा वर्षात वेगाने विकास झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला. व्यावसायिक प्रकल्प, तसेच निवासी प्रकल्प मोठ्या संख्येने या ठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच उत्तम दर्जाचे हॉटेल रेस्टॉरंट व नामांकित रुग्णालय सुद्धा त्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना उत्कृष्ट अशा सोयी सुविधा मिळत आहेत.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

शिरूर तालुक्यामधील रांजणगाव औद्योगिक वसाहत, तसेच भीमा कोरेगाव सणसवाडी एमआयडीसी येथील विविध अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मग या ठिकाणी साधे कर्मचारी असो किंवा मोठ्या पदावर काम करणारे व्यवस्थापक असो. सर्वांचीच वाघोली (Wagholi) परिसरामध्ये राहण्यास मोठी पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात वाघोली मध्ये एक दोन गुंठ्यांसह मोठमोठे गृह प्रकल्प (Housing Project) उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. या मागोमाग तेथे दर्जेदार शिक्षण देणारे नामवंत असे महाविद्यालये व शाळांची संख्या सुद्धा वाढली. त्यामुळे मागील काही वर्षातच नागरिकांची वाघोलीकडे चांगलीच ओढ वाढली.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

पुणे नगर रस्त्यावर केसनंद रस्ता, भावडी रस्ता, बकोरी रस्ता आणि कटकेवाडी या ठिकाणी नामांकित कंपन्यांचे वेअर हाऊस उभे असल्याने स्थानिक नागरिकांना तेथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या वेअर हाऊस मध्ये वाहतुकीची सुविधा भासते, त्यामुळे छोट्या मोठ्या वाहतूकदारांना सुद्धा व्यवसायिक दृष्ट्या फायदा होत आहे. अशा सर्व कारणांमुळे मागील दहा वर्षात वाघोली चा कायापालट झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत असलेली वाघोली आता मागील वर्षे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे या अंतर्गत ड्रेनेज लाईन व्यवस्था, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सोय अशा विविध सुविधा पुणे महानगरपालिका कडून मिळाव्यात. अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वाघोलीत रेडीरेकनरचा दर काय ?

वाघोलीच्या काही भागांमध्ये आपण रेडीरेकनरचा दर बघितला तर पूर्णपणे वेगळा आहे. बी जे एस कॉलेज रस्ता, केसनंद रस्ता, बकोरी रस्ता, यासोबतच गावठाण भागामध्ये रेडीरेकनरचा आपल्याला वेगवेगळ्या असलेला पाहायला मिळेल. सर्वसाधारणपणे 2500 पासून 5500 रुपयांचा दर आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना या भागांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध होतील. त्यामुळे नागरिकांची सुद्धा पसंती मिळत आहे.

काय सांगता! म्हाडा विकणार कमी किमतीत 12 हजार घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

वाघोलीची वैशिष्ट्ये ?

वाघोली गावामधूनच पुणे, औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पुरातन वाघेश्वर मंदिरामुळे या विभागाची एक वेगळीच ओळख आहे. वाघोली लोहगाव रस्ता, वाघोली आव्हाळवाडी मांजरी हडपसर रस्ता, वाघोली केसनंद वाडे बोललाही, तसेच वाघोली खराडी चंदन नगर येरवाडा पुणे स्टेशन रस्ता, वाघोली बकोरी लोणीकंद पेरणे रस्ता, तसेच वाघोली भावडी तुळजापूर रस्ता इत्यादी महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे या ठिकाणी झालेले आहे. 5 किलोमीटर अंतराच्या दुरीवर लोहगाव आंतरराष्ट्रीय सेवा पुरवणारे विमानतळ आहे.

येथे वाघोली ग्रामीण रुग्णालय देखील आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेमध्ये सध्या हे अपुरे पडत आहे. महानगरपालिकेने अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवावी अशी मागणी होत आहे. वाघोली मध्ये नामांकित अशा शैक्षणिक संस्थांचे कॉलेज कॅम्पस आहेत. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसह देश प्रदेशातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.

आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; येथे क्लिक करून पहा कुठे मिळेल स्वस्त घर..

वाघोलीत फ्लॅटचा दर काय ?

1 बीएचके – 15 ते 25 लाख

2 बीएचके – 22 ते 40 लाख

3 बीएचके – 35 ते 55 लाख

बंगलो – हाऊसेस – 30 ते 60 लाख

या फ्लॅट संदर्भात अधिक माहिती समोरील वेबसाइट वर मिळेल.. (1) housing.com (2) 99acres.com (3) magicbricks.com

गतवर्षी वाघोली चा पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आहे. परंतु सध्या कर गोळा करण्याशिवाय इतर कोणत्याही सुविधा पुणे महानगरपालिका पुरवत नाही. वाघोली मध्ये सातत्याने बांधकाम जोरात सुरू आहेत. लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे. अशावेळी मोठमोठ्या सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागते. अशावेळी सोसायटी यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले अंतर्गत रस्ते यांची दुरावस्था झालेली आहे. ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत जाताना बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुणे महानगरपालिकेने फक्त कर गोळा न करता रस्ते, पाणी, तसेच ड्रेनेज लाईनची कामे अगदी तातडीने पूर्ण करावीत – रामभाऊ दाभाडे, व्यावसायिक.

खराडी आयटी पार्क हा परिसर वाघोलीला लागूनच आहे. या आयटी पार्क मुळे वाघोली गावामध्ये नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी अगदी मोठमोठे प्रकल्प उभे केले आहेत. वाघोली मध्ये सुद्धा अनेक प्रकल्प येत आहेत. परंतु त्या तुलनेमध्ये पुणे महानगरपालिका सुविधा देत नाही. महानगरपालिकेच्या माध्यमातून फक्त कर गोळा करण्यावर भर दिला जात आहे. पायाभूत सुविधा वेळोवेळी दिल्या तरच या गावाचा सर्वांगीण विकास होणार आहे. अन्यथा सुविधा अभावी भकास झालेली गावे आपण अनेक पाहिले आहेत. या गोष्टीवर महानगरपालिकेने विचार करावा आणि ड्रेनेज लाईन, तसेच अंतर्गत रस्ते दुरुस्ती करने व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. – संदीप सातव

Leave a Comment