मुंबईकरांना पुन्हा लागणार घरांची लॉटरी; मुंबईत याठिकाणी म्हाडाची 4711 घरे, पहा लोकेशन आणि गटानुसार घरे..!

मुंबईकरांनो, म्हाडा लॉटरीच्या प्रतिक्षेत आहात का? तुम्हालाही मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर (Mhada flat Mumbai) घ्यायचे आहे का? तर मग ही बातमी नक्कीच वाचा. कारण आता पुन्हा मुंबईकरांना घरांची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी सामान्यांना पुन्हा एकदा मिळत असून म्हाडा लॉटरीत (Mhada Lottery) 4 हजार 711 एवढी घरे मिळणार आहेत.

Mhada Flats Mumbai

सध्या मुंबईत घरांच्या किंमती फारच वाढलेल्या असल्याने जण सामान्यांना मुंबईत घर घेणं म्हणजे फारच कठीण काम आहे. मुंबईत लोकेशन नुसार घरांच्या किंमती कमी जास्त होत असल्या तरी साधारण 1 बीएचके घरांच्या किंमती देखील सामान्य लोकांना परवडणाऱ्या नाहीये. पण म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होत असल्याने आपले घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, अशी आशा सामान्य मुंबईकरांना आहे. अशाच आता मुंबईत म्हाडाची 4 हजार 711 घरे सामान्यांना सोडतीसाठी उपलब्ध होणार असल्याने मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही घरे कुठे आहेत? आणि कोणत्या गटासाठी किती घरे आहेत? याची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

याठिकाणी म्हाडाची 4711 घरे (Mhada Flats Mumbai)

गोरेगाव पश्चिम याठिकाणी असलेला पत्रा चाळ प्रकल्प आता म्हाडाने मार्गी लावला आहे. आणि या प्रकल्पामध्ये सामान्य लोकांसाठी सोडतीमध्ये 4 हजार 711 एवढी घरे मिळणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त भूखंडाच्या विक्रीमधून देखील म्हाडाला तब्बल 1700 कोटी रुपये मिळणार आहेत.

म्हाडाचे घर लॉटरीत कसे लागणार? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..

कोणत्या गटासाठी किती घरे?

या प्रकल्पामधील 8 भूखंडांवर सामान्य लोकांसाठी गृहनिर्माण योजना (Housing Scheme) राबविण्याचे म्हाडाकडून ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार चाचपणी केली असून अल्प उत्पन्न गटाकरिता 2556 एवढी घरे, मध्यम उत्पन्न गटाकरिता 1224 घरे तर उच्च उत्पन्न गटाकरिता 931 घरे, अशी एकूण 4 हजार 711 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

2 thoughts on “मुंबईकरांना पुन्हा लागणार घरांची लॉटरी; मुंबईत याठिकाणी म्हाडाची 4711 घरे, पहा लोकेशन आणि गटानुसार घरे..!”

Leave a Comment