खुशखबर! आता स्वस्तात घराचं स्वप्न पूर्ण करा; फक्त 31 मार्च पर्यंत सवलत उपलब्ध, पहा कामाची बातमी..!

मुंबई : सध्याच्या काळात मुंबईत हक्काचं घर (2 BHK Flats Mumbai) विकत घेणं महाग ठरत असलं तरी हक्काचं घर घेणं आज खूपच गरजेचं झालं आहे. हक्काचं घर नसल्यामूळे मुलांचे लग्न जुळत नसल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हक्काचं आणि चांगलं घर नसल्यामुळे अशा अनेक समस्या येतात. त्यामुळे आपला एक हक्काचा फ्लॅट किंवा घर असावे असं बर्‍याच जणांचं स्वप्न असतं. खरं म्हणजे घरासाठी लागणारं बजेट नसल्याने अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता स्वस्तात घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी..

मुंबईत राहणार्‍या सामान्य माणसाला पगार कसा येतो आणि लगेच कसा संपून जातो याबद्दल काहीच कळत नाही. कारण मुंबईत राहणार्‍यांना पाऊलो पावली खर्च करावा लागतो. त्यात पुन्हा बँकेतून होम लोन काढून घर घेतले असेल तर त्याचा हफ्ता महिन्याला भरावाच लागतो. पण आता घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घर घेणे स्वस्त झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया या बॅंकेने घर घेणाऱ्यांसाठी एक मोठी सवलत आणली आहे. त्यामुळे आता तुमचे हक्काचे घर स्वस्तात होणार आहे.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

घर घेणाऱ्यांना मिळणार ही सवलत

बँक ऑफ इंडियाने आपले होम लोन स्वस्त केले आहे. या बॅंकेने एसबीआय आणि एचडीएफसी या बड्या बँकांना सुद्धा मागे टाकले आहे. सध्या बँक ऑफ इंडियाने होम लोनवरील व्याजदर 8.45 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर आणले आहेत. तसेच बँकेकडून आकारण्यात येणारी प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार होम लोनवरील ही सवलत फक्त 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे. 

अरे वा! आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

Leave a Comment