न्यू इअर धमाका ऑफर! या बँकेकडून घ्या सर्वात स्वस्त होम लोन, ही संधी सोडू नका..!

सध्या जो तो नवीन घर बांधताना तसेच मुंबईसारख्या शहरात फ्लॅट (1 bhk flat Mumbai) खरेदी करताना दिसतो. अलीकडच्या काळात अलिशान घर (Luxury Home) असणे हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. अगदी गाव खेड्यांमध्ये सुद्धा मोठ-मोठी सिमेंट काँक्रेटची घरे बांधली जात आहे. आज सामान्य माणूस सुद्धा मुंबईत फ्लॅट (2 bhk flat Mumbai) खरेदी करतोय. हे सर्व बँकांकडून मिळत असलेल्या होम लोनमूळे शक्य झालं आहे. अलीकडेच एका बॅंकेने होम लोन (Home Loan) स्वस्त केले आहे. त्यामुळे आता घर खरेदीला किंवा घर बांधणीला वेग येणार आहे. स्वस्त होम लोनमूळे या नवीन वर्षात तुमचे घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे.

या बॅंकेने स्वस्त केले होम लोन (Cheap Home Loan)

सार्वजनिक क्षेत्रामधील बँक ऑफ महाराष्ट्रकडून होम लोनच्या व्याजदरामध्ये 8.50% वरून 8.35% पर्यंत कपात करण्यात आली आहे. होम लोनच्या व्याजदरात झालेला हा बदल ताबडतोब अमलात येणार आहे. विशेष म्हणजे होम लोन वर असलेले प्रक्रिया शुल्क सुद्धा माफ केले आहे. व्याजदरात केलेली कपात आणि माफ केलेले प्रक्रिया शुल्क या दुहेरी सवलतीमुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून आपल्या होम लोनच्या व्याज दरात करीत असलेली कपात ग्राहकांसाठी नक्कीच आनंदाची बाब असल्याचं बोललं जात आहे.

येथे वाचा – आता म्हाडाकडून दुकानांचा लिलाव; स्वस्तात दुकान घेण्याची संधी, पहा मुंबईत कुठे आहेत म्हाडाची दुकाने?

व्याजदरात ही कपात केल्याने होम लोनवरील सर्वात कमी व्याज दर देणार्‍या बँकांच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश झाला आहे. होम लोन व चारचाकी वाहन या कर्जासोबतच बँकेकडून “न्यू इअर धमाका ऑफर“ याअंतर्गत रिटेल सुर्वण कर्जावर असलेले प्रक्रिया शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

होम लोनचे कपात करण्यात आलेले नवीन व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क माफी तसेच सर्व वित्तीय सेवांसाठी बँकेची वेबसाईट https://bankofmaharashtra.in/ ला भेट द्या.. असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment