मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, पहा संपूर्ण माहिती..!

CIDCO Lottery 2023 : नवीन वर्षामध्ये गुंतवणूकदारांसाठी तसेच हक्काचे घर विकत घेणाऱ्यांसाठी सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमधील वेगवेगळ्या उपनगरांतील भूखंड (2 bhk flat in navi mumbai) योजना विक्रीसाठी जाहिरात जाहीर केली. इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना आणि घराच्या शोधात असणार्‍यांना नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची अखेरची मुदत देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत फ्लॅट (Flat in Mumbai), बंगला तसेच वाणिज्य भूखंड लिलाव पद्धतीद्वारे गुंतवणूकदार खरेदी (navi mumbai flat) करू शकणार आहे.

Navi Mumbai Flat

वाशी, नवीन पनवेल, सानपाडा, घणसोली, कळंबोली नेरुळ आणि खारघर या ठिकाणचे हे भूखंड आहे आणि जास्तीत जास्त 7 हजार ते कमीतकमी दीडशे चौरस मीटर असे विविध भूखंड या योजनेच्या माध्यमातून घेता येणार आहे. सिडकोकडून 4 हजार घरांची योजना (Housing Scheme) आणण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतची असून गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकामधील व्यक्तींना या घरांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये ही घरे (Cidco Flats) आहेत. आणि ही जी सर्व घरे आहेत ती पूर्वीच्या निवासी योजनांमधील शिल्लक असलेली घरे आहेत. सर्वसामान्य व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून सिडकोच्या नवीन गृहनिर्माण योजनेची (Cidco Housing Scheme) वाट पाहत होते. पण अनेक कारणांमुळे सोडतीला विलंब झाला होता.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

दिवाळीच्या काळात तरी सिडकोची गृहनिर्माण योजना जाहीर होईल असं अनेकांना वाटत होते. पण दिवाळीच्या काळात सुद्धा योजना जाहीर न झाल्याने ग्राहकांच्या पदरी फक्त निराशाच पडली. पण आता सिडकोकडून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच 31 डिसेंबरला उर्वरित असलेल्या 4 हजार घरांचे विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. भूखंड विक्री योजना (Plot Scheme) देखील यादरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये नवी मुंबईमधील वेगवेगळ्या भागामधील 64 लहान-मोठे भूखंड आहेत.. हे भूखंड व्यावसायिक तसेच निवासी वापराकरिता आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment