शेतजमीन विकत घेण्यासाठी मिळवा बिनव्याजी कर्ज व अनुदान, पहा काय आहे योजना आणि पात्रता..!

मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी नेहमीच नव नवीन योजना आणण्याचा प्रयत्न करत असते. विशेष करून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्पभूधारक , भूमिहीन शेतकरी व मजुरांसाठी या योजना आखल्या जातात. राज्य सरकारने अलीकडेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.. या योजनेअंतर्गत शेतमजूर व अल्पभूधारकांना बिनव्याजी कर्ज आणि अनुदान दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया किती मिळणार कर्ज? आणि पात्रतेबद्दल.. (Get interest free loans and grants to buy agricultural land, see what is the scheme and eligibility)..

हे पण वाचा – शेतमाल कमी भावात विकू नका, ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मिळवा चांगला भाव..!

किती मिळणार बिनव्याजी कर्ज आणि अनुदान

मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणार्‍या भूमिहीन शेतमजूराला पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या शेतमजूराने आपली पात्रता सिद्ध केली आहे त्यालाच या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कोणते निकष आहे ते आपण पुढे बघुया. पात्रता सिद्ध झाल्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 अंतर्गत शेतजमीन विकत घेण्यासाठी भूमिहीन अर्जदार शेतमजूराला चार एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेती घेण्यासाठी 50% बिनव्याजी कर्ज आणि 50% अनुदान दिले जाते. (50% interest free loan and 50% grant)…

अशी असेल परतफेड (Repayment)..

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जाची 10 वर्षाच्या आत परतफेड करणे गरजेचे आहे. कर्ज घेतल्यापासून दोन वर्षांनी कर्जाची परतफेड (Repayment) सुरू होते.

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Necessary documents)..

अर्जदाराला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे – भूमिहीन असल्याचं सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचं सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, वय आणि अधिवास प्रमाणपत्र, शेत जमीन आवडली असल्याचं प्रतिज्ञापत्र तसेच दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला सहायक आयुक्त किंवा समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी लागणार आहे.

या योजनेसाठी ‘हे’ आहेत पात्र …

कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी त्या योजनेसाठी काय पात्रता (Eligibility) आहे हे बघण खूप महत्वाचं असतं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे –
(1) या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतमजूर असावा.
(2) या योजनेचा लाभ अनुसूचित जातीमधील व्यक्तीलाच मिळेल.
(3) त्या व्यक्तीचे वय 18 ते 60 यामध्ये असणे आवश्यक आहे.
(4) अर्जदाराच्या नावे शेतजमीन नसावी

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजनांचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

One thought on “शेतजमीन विकत घेण्यासाठी मिळवा बिनव्याजी कर्ज व अनुदान, पहा काय आहे योजना आणि पात्रता..!

  • April 8, 2022 at 9:06 am
    Permalink

    Farming is good business

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.